अमरापूर मध्ये मोफत सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन

ज्ञानेश्वर जवरे
शेवगाव/ प्रतिनिधी
अमरापूर- प्रवरा मेडिकल ट्रस्ट च्या आर्ट्स कॉमर्स & सायन्स कॉलेज चे विशेष श्रमसंस्कार शिबिर अमरापुर येथे सुरू असून दिनांक 20 जानेवारी 2019 रोजी त्यामध्ये सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन सरपंच सौ संगीता विजय पोटफोडे यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरामध्ये संत एकनाथ आयुर्वेद रुग्णालययातील आरोग्य पथकाने आलेल्या रुग्णांची मोफत तपासणी करून औषधे दिले.
गावच्या सरपंचांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकानी केलेल्या श्रमदानाचे कौतुक करून पुढील वर्षी या ठिकाणी शिबिर घेण्याचे आवाहन केले. सदर शिबिरासाठी प्रवरा शैक्षणिक संकुल शेवगाव चे कार्यकारी संचालक डॉ.युवराज नरवडे पाटील यांचे सहकार्य लाभले.
यावेळी शिबिरातील डॉक्टर शेख, गावच्या सरपंच सौ पोटफोडे, विजय पोटफोडे, प्राचार्य डॉ. ओमकार रसाळ, उपप्राचार्य प्राध्यापक वर्षा दारकुंडे, रा.सो.यो अधिकारी राजेंद्र काळे, प्रा. समीर शेख प्रा. डुकरे, प्रा. पुलाटे खंडागळे मॅडम, प्रा. गुंजाळ मॅडम महाविद्यालयातील सर्व कर्मचारी रुंद, ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. केशव ससे तर आभार गणेश सूसे यांनी मानले.