अमेरीकेत सांगलीकरांने आपल्या स्वप्नातील गाडीचा नंबर घेतला MH-10

0
ankur mali atlanta
ankur mali atlanta

कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त सातासमुद्रापार परदेशी गेलेल्या भारतीयांना आपल्या गावची ओढ कायमचं असते. गावची आठवण रोज डोळ्यासमोर दिसावी यासाठी अमेरिकास्थीत असणाऱ्या एका सांगलीकराने चारचाकी गाडीचा नंबर चक्क “एमएच-10′ घेतला आहे . इतकंच नव्हे तर वडिलांच्या आठवणीसाठी त्यांच्या नावाची “एएलएम’ अशी अक्षरं अवर्जून घेतली आहेत. अंकुर अर्जुन माळी असे त्या अवल्लीयाचे नाव आहे.

लहानपणापासूनच शिक्षणाची आवड

अंकुर मूळचे कळंबी ( ता . मिरज ) येथील आहेत . वडील अर्जुन लक्ष्मण माळी आणि आई कळंबी गावच्या संरपंच माणिकताई अर्जुन माळी दोघंही शिक्षकी पेशा होते . त्यामुळे लहानपणापासूनच शिक्षणाचा वसा त्यांच्याकडे होता . प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत झाले . त्यानंतर संगणक अभियंता म्हणून ते काम करून लागले .

अभियंता मिरज ते अमेरिका
अमेरिकेतील अँटलांटामध्ये वरिष्ठ अभियंता म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली . मिरज तालुक्‍यातील एका छोट्या खेडेगावातील मुलगा अमेरिकेत नोकरीसाठी गेल्याने चांगलाच नावलौकिक मिळला होता . विवाहानंतर अंकुर यांची पत्नी शुभांगी व मुलगी शिवन्या त्याच्यासोबतच अँटलांटामध्ये राहतात .

गावच्या आठवणीसीठी अणाेखी शक्कल

अमेरिकेतून सांगलीत वारंवार येणे त्यांना जमत नाही . पण , सांगलीची आठवण कायम त्यांच्या मनात यायची . आपली सांगली आपल्या सोबत कायम रहावी , असे त्यांना वाटायचे . यासाठी त्यांनी चारचाकी गाडी खरेदी केल्यानंतर जाणीवपूर्वक ” एमएच 10′ क्रमांक घेतला . त्यापुढे तीन अक्षरे टाकयची होती . त्यातही त्यांनी वडिलांच्या आठवणीसाठी ” एएलएम ‘ ( अर्जुन लक्ष्मण माळी ) अशी अक्षरे घेतली . तेथील आरटीओ विभागाने त्याला परवानगीही दिली . अँटलांटामध्ये ” एमएम -10’ पासिंग गाडी धावती आहे .

सांगलीच्या आठवणी ताज्या झाल्या

” अमेरिकेत लायसन्स्‌ मिळावण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात . पक्के लायसन्स्‌ मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला जातो . गाडी खरेदी केल्यानंतर अमेरिकेत आपल्या आवडीचा नंबर घेवू शकतो . तो नंबर यापूर्वी कोणीही घेतला नसले , तर तो नंबर आपल्याला मिळतो . यानिमित्ताने सांगलीच्या आठवणी माझ्यासमोर उभ्या राहतात .”
– अंकुर माळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here