आदर्श वडुले गावचे सरपंच दिनकरराव गर्जे यांनी पदभार स्वीकारला उपसरपंचपदी अर्चना देवढे यांची निवड झाली

माळिचीचोरा/प्रतिनिधी. अदिनाथ केदार

नेवासा तालुक्यातील आदर्श वडुले गावचे सरपंच
दिनकरराव गर्जे यांनी सरपंचपदाचा पदभार स्वीकारला असून उपसरपंचपदी अर्चना देवढे यांची बिनविरोध निवड झाली
नेवासा तालुक्यातील आदर्श वडुले गावाची ४महिन्यांपासून निवडणूक झाली
यावेळी झालेल्या जनतेतून सरपंच निवडणुकित सरपंचपदी जिल्हा नियोजन समिती सदस्य दिनकरराव गर्जे हे विजयी झाले होते काल मंगळवार दि २९ रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नवनिर्वाचित सरपंच दिनकर गर्जे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली सौ अर्चना ज्ञानेश्वर देवढे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी नेवासा तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांनी केली ग्रामसेविका अर्चना कडू यांचे सहकार्य लाभले नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य कस्तुरबाई बबन हळनोर, लता नंदू गर्जे, कडूबाई विष्णू सरोदे, सुनिता शंकर खाटिक , अनिता नवनाथ सरोदे , लताबाई बाबासाहेब आतकरे नवनिर्वाचित सरपंच दिनकर गर्जे उपसरपंच अर्चना देवढे व सदस्याचे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळी माजी सरपंच आशाताई गर्जे तंटामुक्ती गाव अध्यक्ष बाबासाहेब आतकरे अॅड प्रसाद गर्जे ग्रामस्थ उपस्थित होते