दगड खाणीवरील रॉयल्टी माफी तसेच दंडात्मक कारवाई न करण्याची मागणी

0
दगड खाणीवरील रॉयल्टी
दगड खाणीवरील रॉयल्टी

नागपूर (१९ डिसेंबर) – वडार समाजाच्या दगड खाणीवरील बंद काळातील रॉयल्टी माफ करून त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये अशी मागणी नागपूर येथील विधानसभेत आमदार प्रणिती शिंदे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.

यामध्ये सोलापूरात वडार समाज हा गेली अनेक वर्षे व्यवसाय करीत असून या समाजाची लोकसंख्या सुमारे 70 ते 90 हजारांच्या आसपास आहे. हा समाज गरीब कष्टकरी असून पोट भरण्यासाठी गावोगावी भटकंती करीत असतात. त्यामुळे हा समाज अशिक्षित राहिलेला असून अत्यंत हलाकीचे जीवन जगत आहे. सोलापूर जिल्ह्यातील दगड खाणी माळढोक अभयारण्यासाठी बंद केल्यामुळे या दगडखाणीवर अवलंबून असलेल्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या जवळपास दिड लाख कामगारांचा रोजगार हिरावून घेतल्याने चालू स्थितीतील दगड खाणीतील उत्पादन शासनाच्या 12 जुलै 2006 रोजीच्या आदेशाने बंद केल्याने 12 दगड खाणीतील मजूरांना उपासमारीमुळे जगणे कठिण झालेले आहे.

सदर खाणीचे जमिनी हे गायरान जमिनी किंवा सरकारी जमिनी नसून सदरच्या खाणीकरीता असलेल्या जमिनी हे स्वमालकीचे कर्जे काढून घेतल्यामुळे या कर्जाचा डोंगर त्यांच्या डोक्यावर असताना रॉयल्टी म्हणून शासन त्यांना दोनशे पटीने वारंवार वाढविले जाते.

प्रत्येक जाती जमातीत पूर्वापार पिढीजात चालत असलेला एक व्यवयाय असून त्यांच्याशी त्यांच्या प्रथा, रुढी व संस्कृती जोडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याचा समाज देखील दगड फोडणे, मातीकाम करणे, बांधकाम करणे हा पिढीजात व्यवसाय करीत आहे. राष्ट्राच्या व शहराच्या विकासामध्ये त्याचा समाजाने प्रत्येक धरणे, तलाव, विहीरी, किल्ले, मंदिरे, चर्च, मस्जिद त्याचबरोबर घरगुती संसारा उपयोगी पाटा, वरवंटा, खलबत्ते व मोठमोठे खोदकामे व बांधकामे या माध्यमातून आजतागायत राष्ट्रविकासात अग्रहक्काने भर घालण्यात आलेला आहे. तत्कालीन आघाडी सरकारने महाराष्ट्रातील वडार समाजाच्या खाणीवरील रॉयल्टीपौकी 200 ब्रास रॉयल्टी समाजाचे पारंपारीक व पिढीजात व्यवसाय म्हणून माफ करून सवलत दिलेली आहे.

असे सांगत आमदार प्रणिती शिंदे यांनी वडार समाजाच्या दगड खाणीवरील बंद काळातील रॉयल्टी माफ करून त्यांच्यावर रितसर कोणतीही दंडात्मक कारवाई होवू नये याकरीता महसूल मंत्री यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली. यावेळी लक्ष्मण विटकर, शंकर चौगूले, विष्णू मुदोळकर, बालाजी निंबाळकर, अनिल धोत्रे, शंकर बाबूराव चौगूले, राजू चौगूले, अरुण चौगूले, तुकाराम चौगूले, नवनाथ निंबाळकर, अप्पाराव विटेकर, अशोक भरले आदि. उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here