देशहितासाठी खूप काही सहन करावा लागतं : पंतप्रधान मोदी

0
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नईदिल्ली (२० डिसेंबर) – देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न सुरु असून हे सर्व सहजतेने होत नाही. यासाठी खूप काही सहन करावं लागतं, पण देशासाठी करावं लागतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते दिल्लीत द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इन्डस्ट्रीज ऑफ इंडियाच्या (असोचम) कार्यक्रमात बोलत होते.
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन गुरुवारी चिघळलं. विद्यापीठांसह शिक्षण संस्थांच्या आवारातील आंदोलनाची धग देशभर पसरली आणि दिल्लीसह मुंबई, बंगळूरु, लखनऊ आदी शहरांबरोबरच विविध राज्यांत लोक रस्त्यावर उतरले. पोलिसांच्या गोळीबारात लखनऊमध्ये एक तर मंगळूरमध्ये दोघांचा मृत्यू झाला. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे नागरिकत्व कायदा धाडसी निर्णय असल्याचं म्हटलं आहे.
मोदी पुढे म्हणाले कि, देशाला संकटातून बाहेर काढताना अनेक लोकांचा संताप सहन करावा लागतो. आपल्यावर होणारे आरोप सहन करावे लागतात. पण हे सर्व घडत असतानाही देशासाठी करावं लागतं. ७० वर्षांची सवय बदलण्यासाठी वेळ लागतो. पण, देशासाठी करावं लागतं”. नरेंद्र मोदी यांनी थेटपणे नागरिकत्व कायद्याचा उल्लेख केला नाही. मात्र अप्रत्यक्षपणे आपलं म्हणणं मांडलं. त्यांनी सांगितलं की, “सगळं असंच झालं असेल का ? अनेक लोकांची नाराजी ओढावून घ्यावी लागते. अनेक आरोप होतात. पण देशासाठी करायचं असल्याने हे सर्व सहन करावं लागतं”. नरेंद्र मोदी अर्थव्यवस्थेसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांवर बोलत होते. मात्र त्यांचा इशारा अप्रत्यक्षपणे देशभरात नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या आंदोलनावर होता असं बोललं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here