नेवासा तालुक्यातील माजी आमदार शंकरराव गडाख यांना अटक वॉरंट जारी केले आहेत

अहमदनगर. नेवासा प्रतिनिधी.
नेवासा तालुक्यातील विविध प्रश्नावर रस्ता रोको व आंदोलन केल्याप्रकरणी नेवाशाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांना अटक वॉरंट जारी आहे .गडाख यांच्यावर. 341.143.149.188. या कलमानुसार आरोप आहेत. शंकरराव गडाख यांनी सत्तेत असतांना आपल्याच सरकार विरोधात रस्ता रोको व नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. तसेच गेल्या ४ वर्षांपासून गडाखांनी विविध आंदोलन केले आहे शेतकऱ्यांचा प्रश्नावर केलेल्या अनेक आंदोलना दरम्यान गडाख यांच्यावर शासनाने पोलिसांकरवी गुन्हे दाखल केलेले आहेत. न्यायालयाने नुकतेच एका आंदोलनप्रकरणी गडाख यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावल्याची माहिती हाती आली असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते . प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ नेवासा यांनी हे अटक वॉरंट जारी केले आहेत,