बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल – सयाजी शिंदे

0
Sayaji Shinde
Sayaji Shinde

बीड – शहराजवळ सह्याद्री देवराई प्रकल्पातून ऑक्‍सिजन झोन तयार केला जात आहे. परिसरात विशिष्ट जातींची झाडे चिटकून लावली जात असून, यातून भविष्यात घनदाट जंगलाची निर्मिती केली जाणार आहे. परिसरात लिंब, पिंपळ, वड यासह विविध जातींची झाडे लावली जात आहेत.

बीड – शहराजवळच्या पालवण येथे शासनाच्या वनविभागासह लोकसहभागातून सह्याद्री देवराई हा प्रकल्प तीन वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे. वृक्षसंगोपनाची चळवळ अधिकाधिक व्यापक व्हावी, या उद्देशाने हा प्रकल्प राबवला जात आहे. दोन वर्षांत या ठिकाणी एक लाख 64 हजार विविध जातींच्या वृक्षांची लागवड केली गेली आहे. 207 हेक्‍टर क्षेत्राचा हा परिसर लोकसहभागातून पूर्ण केला जात आहे. पालवणचा सह्याद्री देवराई हा प्रकल्प लवकरच सबंध महाराष्ट्रासाठी पथदर्शी ठरेल, असा विश्‍वास अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला.

सह्याद्री देवराई परिसरात शनिवारी (ता. 21) सायंकाळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी लेखक, पटकथा दिग्दर्शक अरविंद जगताप यांच्यासह शिल्पकार किशोर ठाकूर, सतीश मोरे, सचिन चंदने, वृक्षतज्ज्ञ रघुनाथ ढोले, सह्याद्री देवराई प्रकल्पाचे सचिव मधुकर फल्ले (सातारा) यांच्यासह शिवराम घोडके, बीडच्या सहायक वनअधिकारी सोनाली वनवे उपस्थित होत्या. यावेळी डोंगर रांगेत वडाच्या झाडाची लागवड करण्यात आली.

सयाजी शिंदे म्हणाले, सह्याद्री देवराई प्रकल्पातून ऑक्‍सिजन झोन तयार केला जात आहे. परिसरात विशिष्ट जातींची झाडे चिटकून लावली जात असून, यातून भविष्यात घनदाट जंगलाची निर्मिती केली जाणार आहे. परिसरात लिंब, पिंपळ, वड यासह विविध जातींची झाडे लावली जात आहेत. “येऊन, येऊन येणार कोण? झाडांशिवाय हायच कोण?’ ही टॅगलाइन घेऊन आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. स्थानिकांनीही या चळवळीत पुढाकार घ्यावा.

जानेवारीत पालवनला पहिले वृक्षसंमेलन
सह्याद्री देवराई प्रकल्प अधिक परिणामकारक पद्धतीने राबवला जात असून, या ठिकाणी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्राचे पहिले वृक्षसंमेलन होणार असल्याची माहिती सयाजी शिंदे व अरविंद जगताप यांनी दिली. संमेलनाच्या तयारीसाठी व्यापक बैठका घेतल्या जात असून, बीडकरांनीही यासाठी पुढाकार घ्यावा. संमेलनात जिल्ह्यातील अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार असून, याठिकाणी किमान 50 स्टॉल उभारले जाणार आहेत. त्यात फुलपाखरांच्या विविध जातींचे छायाचित्र प्रदर्शन भरवले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here