भाजपाला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ नगरसेवकांना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली

अहमदनगर :- अहमदनगर महानगरपालिका महापौरपदाचे निवडणुकीसाठी पक्षाने जातीयवादी पक्षांना पाठिंबा देऊ नये अथवा आपल्या पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांच्या बाजूने मतदान करु नये. असे स्पष्ट आदेश दिलेले होते. परंतु पक्षाचा आदेश डावलून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांनी भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवारास पाठिंबा देऊन मतदान केले. त्यामुळे पक्षादेशाचा भंग झालेला आहे. पक्षादेशाचे पालन न केल्यामुळे आपला खुलासा ७ दिवसात करावा म्हणून १८ नगरसेवकांना नोटीस पाठविण्यात आली होती . त्यावर अद्याप कोणताही खुलासा न केल्यामुळे या १८ नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्यात येत असल्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी दि १२. तारखेला दिले आहेत. दुसरीकडे पक्षविरोधी घडामोडी होत असताना याबाबतची माहिती अथवा कल्पनाही पक्षश्रेष्ठींना न दिल्याबद्दल नगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना पदावरून काढून टाकण्यात येत असल्याचेही पत्र प्रदेशाध्यक्षांनी दिले आहे . राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कठोर कारवाईमुळे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे