शिक्षणाला चांगले दिवस येणार : आ. विक्रम काळे

0

महाविकास आघाडी सरकारचा शिक्षकांच्या बाजुने पहिला निर्णय

नागपूर: आज सभागृहात आ. विक्रम काळे, आ. कपिल पाटील यांनी तत्कालीन सरकारने शिक्षकांचे वेतन विद्यार्थीसंख्येनूसार देण्याबाबत व इतर 31 मुद्द्यांसाठी मा. शिक्षण आयुक्तांनी अभ्यासगटाची नियुक्ती केली होती. त्यामुळे संबंध राज्यभर शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. आ. विक्रम काळे यांनी यापूर्वीच शिक्षणा आयुक्तांना पत्र देऊन हा अभ्यासगट रद्द करण्याची मागणी केली होती.

त्यानुसार आज सभागृहात आ. विक्रम काळे, आ. कपिल पाटील यांनी याविषयी लक्षवेधी मांडून हा अभ्यासगट रद्द करण्याची मागणी केली. त्यानुसार शालेय शिक्षण मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी हा अभ्यासगट रद्द करण्याची सभागृहात घोषणा केली.

त्याचबरोबर 1) वरिष्ठ महाविद्यालयांच्या कायम शब्द काढावा 2) चित्रकला महाविद्यालय व फार्मसी विद्यालयांना 90% वेतन देण्याऐवजी 100% वेतनअनुदान द्यावे 3) प्राध्यापकांच्या 7 व्या वेतन आयोगातील त्रुटी दुर कराव्यात 4) P.hd च्या 2 वेतनवाढी सुरु करणे 5) कॅस चा लाभ मुळ दिनांकापासून देणे यासाठी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले होते.

त्यावेळी या प्रश्नांसाठी आमचे सरकार सकारात्मक असून याबाबत मी लवकरच माझ्या दालनात आपणांस बोलावून बैठक आयोजित करतो व हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे उत्तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. सुभाष देसाई यांनी दिले आहे. त्यामुळे यापूढील काळात शिक्षणाला चांगले दिवस येणार असल्याची भावना आ. विक्रम काळे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here