शेतकऱ्यांच्या धर्तीवर रिक्षा चालकांचे कर्जमाफ करा : आडम मास्तर

0
riksha karj mafi

सोलापूर (३० डिसेंबर) – शासनाने मोठमोठ्या उद्योजकांचे कर्जमाफ केले, त्यांना कोट्यवधी रुपयांची सवलती दिल्या, ११ लाख कोटी रुपयांची थकबाबी देशातील मूठभर श्रीमंताकडे आहे. याची वसूल करण्याची ईच्छाशक्ती सरकारकडे नाही, अशी टीका करीत शेतकऱ्यांच्या धर्तीवर रिक्षा चालकांचे कर्ज माफ करा.अशी मागणी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केले.

रिक्षाचालक संघटना कृती समितीच्या वतीने रिक्षाचालकांच्या विविध प्रलंबित न्याय हक्काच्या मागण्या घेऊन आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली सलीम मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांना शिष्टमंडळामार्फत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी भोसले यांनी रिक्षाचालकांच्या विविध मागण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत जिल्हा परिवहन प्राधिकरणाची बैठक कृती समितीसोबत बोलावून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सकारात्मक आश्वासन दिले.

यावेळी शिष्टमंडळात आरिफ मणियार, अजीज खान,सुनील भोसले,अनिल मोरे,रफिक पिरजादे, अकबर लालकोट, चाँद मुजावर, वसीम देशमुख, जावेद शेख, महेश पेंटर, रशीद मैंदर्गी, जविर सौदागर, सैफन मकानदार, कमलाकर आदी उपस्थित होते.

आडम म्हणाले की, अहोरात्र प्रवाश्यांना सेवा देणारे रिक्षाचालक कर्जामुळे हतबल झालेले आहेत. कर्जाच्या विळख्यातुन जर रिक्षाचालकांची मुक्तता नाही केल्यास महाराष्ट्रातील १५ लाख रिक्षाचालक रस्त्यावर उतरतील आणि येत्या ८ जानेवारी रोजीच्या देशव्यापी संपात सहभागी होतील असा इशाराही दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here