शेवगाव तालुक्यातील वाडगाव थाटे गावामध्ये जय भगवान महासंघ शाखेचे उद्घाटन

ज्ञानेश्वर जवरे
शेवगाव/प्रतिनिधी
जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या हस्ते जय भगवान महासंघाची शाखा व स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावे चौकाचे उद्घाटन वाडगाव थाटे येथे करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब सानप यांनी अशी माहिती दिली की,भगवान बाबांची पालखी औरंगाबाद ते भगवान गड या मार्गाने प्रथमच वर्षी सुरवात करण्यात आली आहे आणि यानंतर ही प्रत्येक वर्षी पायी पालखी येणार आहे व त्यामध्ये भक्तांनी सहभाग घ्यावा साठी त्यांनी आवाहन केले.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष गणेश ढाकणे व वाडगावचे नवनिर्वाचित शाखाध्यक्ष डॉ.अंकुश दराडे, उपाध्यक्ष राजेंद्र केदार,कोषागार रुस्तुम जवरे,उपकोषागार बाळासाहेब शिरसाठ, सचिवमहादेव जवरे,सरचिटणीस विकास जवरे, बंडू जवरे, देविदास जवरे भाऊसाहेब जवरे, मुरली जवरे, वामन जवरे, अशोक जवरे, शहादेव जवरे, चंद्रभान जवरे, शिवराम जवरे, कानिफनाथ तरुण मंडळ, समस्त गावकरी मंडळी व जय भगवान महासंघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन अंकुश दराडे यांनी केले तर आभार लहू जायभाये यांनी मांडले.