श्री संत एकनाथ आयुर्वेद रुग्णालयात पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

ज्ञानेश्वर जवरे
शेवगाव/ प्रतिनिधी
प्रवरा मेडिकल ट्रस्टचे श्री संत आयुर्वेद रुग्णालयातर्फे शेवगाव, पाथर्डी व नेवासा तालुक्यातील पोलिसांसाठी दिनांक २२ ते २५ जानेवारी २०१९ या कालावधीत मोफत आरोग्य शिबीर ठेवण्यात आले आहे. या कालावधीत येणाऱ्या पोलिसांच्या सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार असून जर व्याधी असेल तर अल्प दरात उपचार केले जातील.असे युवराज पाटील नरवडे म्हणाले.
या वेळी डी.वाय.एस.पी.मंदार जावळे साहेब म्हणाले कि प्रत्येकासाठी आरोग्य तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.आपण तंदुरुस्त आहोत किंवा नाही या साठी वैद्यकीय तपासण्या करणे आवश्यक आहे. आपल्याला आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे शिबीर घेण्यास आयुर्वेद रुग्णालय जे सहकार्य करत आहे. त्याचा सर्व पोलीस सहकार्याने लाभ घ्यावा. या वेळी डॉ.किरण वाघ म्हणाले कि पोलीस आणि डॉक्टर यांच्या कार्यामध्ये समानता आहे. आमच्या कामाला वेळेचे बंधन नसते. त्यामुळे कळत नकळत आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आपण कितीही तंदुरुस्त वाटत असलो तरी प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे. डॉ.योगेशकुमार गीते यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना आयुर्वेद व आयुर्वेदीय उपचार पद्धती याविषयी थोडक्यात माहिती दिली. आजच्या या शिबिरात एकूण ७५ पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यात पांढरी कावीळ, किडनी, मधुमेह, रक्त व पेशींचे प्रमाण, नेत्र तपासणी, ई.सी.जी.व पंचकर्म चिकित्सा या तपासण्या करण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी शेवगाव पोलीस स्टेशनचे डी.वाय.एस.पी.मंदार जावळे साहेब, पी.आय.रामराव ढिकले, पाथर्डी पोलीस स्टेशनचे पी.आय.दिनकर मुंढे, नेवासा पोलीस स्टेशनचे पी.आय.रणजित डेरे, महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ.युवराज पाटील नरवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.किरण वाघ, उपअधीक्षक डॉ.शिंदे भाऊसाहेब, डॉ.रामेश्वर पवार, डॉ.संदीप शिंदे , डॉ.मंगेश जरांगे, डॉ.अभिजित शिरसाट , डॉ.महेश डोळस, डॉ.गणेश नरवडे, इतर डॉक्टर्स व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक पी.आय.रामराव ढिकले साहेबानी तर आभार धनंजय फलके यांनी मानले.