संगणक परिचालीकेचा आत्मदहाणाचा प्रयत्न पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला


नेवासा प्रतिनिधी. अदिनाथ केदार
शेवगाव :- गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या जाचाला कंटाळून ग्रामपंचायत महिला संगणक परिचालीकेने गटविकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव यांच्या दालनासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला
मात्र पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे

हि घटना टळली
मौज खूटेफळ व बोडखे येथील ग्रामपंचायत मधिल महिला संगणक परिचारक सौ सुनिता वाणी या
संगणक परिचारक पदावर काम करत होत्या
सध्या त्या ढोरजळगाव येथे काम करत आहेत
माञ त्यांना ग्रामपंचायतीचे दोन महिन्याचे मानधन वेतन मिळालेले नसल्याने त्यांनी पंचायत समिती येथे २१ जानेवारी रोजी उपोषण केले होते,
त्या वेळी दोन्ही गावच्या ग्रामसेवकांनी सात दिवसांत मानधन देण्याचे लेखी आश्वासन दिले होते,
मात्र या बाबत काहिही कारवाई न झाल्याने त्यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी अशोक भवारी
व बदली झालेल्या ग्रामसेवक राजेंद्र साखरे यांच्या जाचाला

कंटाळून सोमवार दि ४ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला
मात्र कार्यालयन कर्मचाऱ्यांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने ही घटना टळली,
कर्मचार्‍याने तत्काळ घटनेची माहिती गटविकास अधिकारी यांना दिली
मात्र या घटनेचे गांभीर्य न घेता सदर जबाबदारी अधिकारी तासाभराने कार्यालयात हजर झाले
सदर पोलिसांनी संगणक परिचालीकेस ताब्यात घेण्यास प्रयत्न केला असता मि घरी जाऊन पुन्हा आत्मदहनाचा करील यास कारणीभूत असलेल्या सर्वाची नावे घरी लिहून ठेवले आहेत
असा सज्जड इशारा दिल्याने पोलिसांना नमते
घ्यावे लागले या नतंर
पंचायत समिती सभापती डाॅ क्षितेज घूले रा काॅ युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे सरपंच सजय शिदे यांनी या
परिचालेकेस धीर देऊन त्यांचावर होत असलेल्या जाचाचा बंदोबस्त करण्याची ग्वाही दिली
त्यांच्या मागण्या मार्गी लावल्याने महिला संगणक परिचालीकेने घरी जाऊन आत्मदहनाचा प्रयत्न
स्थगित केला
गटविकास अधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत तुमची आई बहिण आसतीतर तुम्ही असा अन्याय केला असता का असा खडा सवाल वाणी
यांनी गटविकास अधिकाऱ्यांना केल्याने ते
सुन्न झाले होते