संगणक परीचालीकेचा आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे टळला अनर्थ

शेवगाव (प्रतिनिधी) दि. : गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या जाचाला कंटाळून ग्रामपंचायत महिला संगणक परीचालीकेने गटविकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव यांच्या दालनासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हि घटना टळली.
मौजे खुंटेफळ व बोडखे येथील ग्रामपंचायत मधील महिला संगणक परिचालक श्रीम.सुनिता विठ्ठल वाणी ह्या संगणक परिचालक पदावर काम करत होत्या. सध्या त्या ढोरजळगाव येथे त्या काम करीत आहेत. मात्र त्यांना ग्रामपंचायतीचे २ महिन्याचे मानधन मिळालेले नसल्याने त्यांनी पंचायत समिती मध्ये २१ जानेवारी रोजी उपोषणहि केले होते. त्यावेळी दोन्ही गावाच्या ग्रामसेवकांनी सात दिवसात मानधन देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र या बाबत काहीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी व बदली झालेले ग्रामसेवक राजेंद्र साखरे यांच्या जाचाला कंटाळून सोमवार दि. ४ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हि घटना टळली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती गटविकास अधिकारी यांना दिली. मात्र या घटनेचे गांभीर्य न घेता सदर जबाबदार अधिकारी तासभराणे कार्यालयात हजर झाले.
दरम्यान पोलिसांनी सदर संगणक परीचालीकेस ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता मी. घरी जाऊन पुन्हा आत्मदहन करील, यास कारणीभूत असणाऱ्या सर्वांची नावे घरी लिहून ठेवली आहेत., असा सज्जड इशारा दिल्यामुळे पोलिसांना नमते घ्यावे लागले. या नंतर प.स.सभापती डॉ.क्षितीज घुले रा.कॉ. युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे सरपंच संजय शिंदे यांनी या परीचालीकेस धीर देऊन त्यांच्यावर होत असलेल्या जाचाचा बंदोबस्त करण्याची ग्वाही दिली. त्यांच्या मागण्या मार्गी लावल्याने महिला संगणक परीचालीकेले घरी जाऊन आत्मदहन करण्याचा निर्णय स्थगित केला.
गटविकास अधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत तुमची आई,बहिण असती तर तुम्ही असा अन्याय केला असता का . असा खडा सवाल वाणी यांनी गटविकास अधिकाऱ्यास केल्याने ते सुन्न झाले. होते.त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यास येथे बोलावून घ्या. अशी मागणी या परीचालीकेने लावून धरली, मात्र घटनेची माहिती मिळाल्याने यास कारणीभूत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे यावेळी फोन बंद होते.