11 December Dinvishesh – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
11 December Dinvishesh
11 December Dinvishesh

11 December Dinvishesh 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (11 December Dinvishesh):

1816 : इंडियाना हे अमेरिकेचे 19 वे राज्य बनले.

1930 : सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक जाहीर.

1941 : दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.

1946: युनिसेफ (UNICEF) ची स्थापना.

1967 : कोयना येथे 6.5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन 180 जण ठार आणि 1500 लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.

1972 : अपोलो मोहिमेतील अपोलो 17 हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.

1994 : अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.

2001 : चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश.

2006 : अंतराळवीर सुनिता विल्यम आय. एस. एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर पोहोचली.

जन्मदिन:

1843 : क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी 1905 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचा जन्म. (मृत्यू: 27 मे 1910)

1867 : आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचा जन्म. (मृत्यू: 25 मार्च 1940)

1882 : तामिळ साहित्यिक सुब्रम्हण्यम भारती यांचा जन्म. (मृत्यू: 11 सप्टेंबर 1921)

1892 : पद्मभूषण, रुरकी विद्यापीठाचे कुलगुरू, राज्यसभा खासदार, योजना आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष, ओरिसाचे राज्यपाल, पद्मविभूषण अयोध्या नाथ खोसला यांचा जन्म.

1899 : कादंबरीकार पुरूषोत्तम यशवंत देशपांडे यांचा जन्म.

1909 : साहित्य अकादमी पारितोषिक विजेते भाषाशास्त्रज्ञ नारायण गोविंद कालेलकर यांचा जन्म.

1915 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस यांचा जन्म. (मृत्यू: 17 जून 1996)

1922 : अभिनेते मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार यांचा जन्म.

1925 : मराठी साहित्यिक राजा मंगळवेढेकर यांचा जन्म. (मृत्यू: 1 एप्रिल 2006)

1929 : लेगस्पिनर सुभाष गुप्ते यांचा जन्म. (मृत्यू: 31 मे 2002)

1931 : आचार्य रजनीश यांचा जन्म. (मृत्यू: 19 जानेवारी 1990)

1935 : भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ प्रणवकुमार मुखर्जी यांचा जन्म.

1942 : प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचा जन्म. (मृत्यू: 26 मार्च 1999)

1969 : भारतीय बुद्धिबळपटू विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांचा जन्म.

स्मृतिदिन:

1783 : रघुनाथराव पेशवा यांचे निधन. (जन्म: 18 ऑगस्ट 1734)

1971 : मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: 26 नोव्हेंबर 1902)

1987 : लेखक गुरुनाथ आबाजी कुलकर्णी उर्फ जी. ए. कुळकर्णी यांचे निधन. (जन्म: 10 जुलै 1923)

1992 : भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांचे निधन.

1998 : राष्ट्रकवी प्रदीप यांचे निधन. (जन्म: 6 फेब्रुवारी 1915)

2001 : भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचे निधन. (जन्म: 17 मार्च 1909)

2001 : झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान मेन्झा चोना यांचे निधन. (जन्म: 21 जानेवारी 1930)

2002 : कायदेपंडित आणि अर्थतज्ञ नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला यांचे निधन. (जन्म: 16 जानेवारी 1920)

2004 : भारतरत्न गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे निधन.

2013 : भारतीय तत्त्ववेत्ता आणि विद्वान शेख मुसा शरीफी यांचे निधन.

2015 : भारतीय चित्रकार आणि मूर्तिकार हेमा उपाध्याय यांचे निधन.

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here