11 November Dinvishesh – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
11 November Dinvishesh
11 November Dinvishesh

11 November Dinvishesh 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (11 November Dinvishesh):

1926 : अमेरिकेतील रस्त्यांना सख्यांवरून नामकरण करण्यात आले.

1930 : आइनस्टाइन रेफ्रिजरेटरच्या शोधासाठी अल्बर्ट आइनस्टाइन आणि लिओ झिझार्ड यांना पेटंट देण्यात आले.

1942 : दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीने फ्रान्स वर कब्जा घेतला.

1947 : पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले. 1 मे 1947 पासून साने गुरुजींनी त्यासाठी काही काळ उपोषण केले होते.

1962 : कुवेतने नवीन संविधान अंगीकारले.

1975 : अंगोला देशाला स्वातंत्र्य मिळाले.

1981 : अँटिगा आणि बार्बुडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

2004: यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी नियुक्ती.

जन्मदिन:

1821 : रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ फ्योदोर दोस्तोवस्की यांचा जन्म. (मृत्यू: 9 फेब्रुवारी 1871).

1851 : विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत राजारामशास्त्री भागवत यांचा जन्म. शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी 1884 मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिन्दूधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते. (मृत्यू: 4 जानेवारी 1908 – मुंबई).

1886 : लावणी लेखक श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचा जन्म. (मृत्यू: 22 डिसेंबर 1945).

1888 : स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा आचार्य कॄपलानी यांचा जन्म. (मृत्यू: 19 मार्च 1982).

1888 : स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचा जन्म. (मृत्यू: 22 फेब्रुवारी 1958).

1904 : भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक जे. एच. सी. व्हाइटहेड यांचा जन्म. (मृत्यू: 8 मे 1960).

1911 : लोककवी गोपाळ नरहर तथा मनमोहन नातू यांचा जन्म. (मृत्यू: 7 मे 1991).

1924 : कसोटीपटू रुसी शेरियर मोदी यांचा जन्म. (मृत्यू: 17 मे 1996).

1926 : विनोदी अभिनेता बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांचा जन्म. (मृत्यू: 29 जुलै 2003).

1936 : मतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या कामायनी या संस्थेच्या संस्थापिका सिंधुताई जोशी यांचा जन्म.

1936 : हिंदी, नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री माला सिन्हा यांचा जन्म.

1942 : वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू रॉय फ्रेड्रिक्स यांचा जन्म. (मृत्यू: 5 सप्टेंबर 2000).

1962 : अमेरिकन अभिनेत्री, निर्मात्या, दिग्दर्शिका, गीतलेखिका आणि मॉडेल डेमी मूर यांचा जन्म.

1972 : किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्‍न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचा जन्म. (मृत्यू: 27 ऑक्टोबर 1937).

1985 : भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यांचा जन्म.

मृत्यूदिन:

1984 : मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते मार्टिन ल्यूथर किंगसिनीअर यांचे निधन. (जन्म: 19 डिसेंबर 1899).

1994 : ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ कुवेम्पू यांचे निधन. (जन्म: 29 डिसेंबर 1904).

1997 : चित्रपट अभिनेते यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त यांचे निधन..

1999 : शिल्पकार अरविंद मेस्त्री यांचे निधन..

2004 : नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते यासर अराफत यांचे निधन. (जन्म: 24 ऑगस्ट 1929).

2005 : ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक पीटर ड्रकर यांचे निधन.  (जन्म: 19 नोव्हेंबर 1909).

2005 : नेत्रतज्ज्ञ डॉ. एम. सी. मोदी यांचे निधन.

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here