12 November Dinvishesh – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
12 November Dinvishesh
12 November Dinvishesh

12 November Dinvishesh 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (12 November Dinvishesh):

1905 : नॉर्वेच्या जनतेने सार्वमतात प्रजासत्ताक होण्याऐवजी राजसत्ताच कायम ठेवण्याचा कौल दिला.

1918 : ऑस्ट्रिया देश प्रजासत्ताक बनला.

1927 : सोविएत कम्युनिस्ट पक्षातुन लिऑन ट्रॉटस्कीची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे जोसेफ स्टॅलिनच्या हातात सर्व सत्ता गेली.

1930 : पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

1945 : पुण्यात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांची राजकीय परिस्थितीवर साडेदहा तास चर्चा झाली.

1956 : मोरोक्को, सुदान आणि ट्युनिशियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

1990 : टिम बर्नर्स-ली यांनी वर्ल्ड वाइड वेबसाठी औपचारिक प्रस्ताव प्रकाशित केला.

1997 : 1993 च्या जागतिक व्यापार केंद्रावर बॉम्बफेक करणारे रमोजी युसेफ दोषी ठरले.

1998 : परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन (PIO) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले. 15 सप्टेंबर 2002 पासून या योजनेच्या अंमलबजावणीस प्रत्यक्ष सुरुवात झाली.

2000 : 12 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

2000 : भारताची वूमन ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रम्हण्यम हिने तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे झालेल्या 34 व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमधे वैयक्तिक रौप्यपदक मिळवले.

2003 : शांघाय ट्रान्सरॅपिड या प्रवासी रेल्वेने ५०१ किमी/तास या वेगाने जाण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

जन्मदिन:

1817 : बहाई पंथाचे संस्थापक बहाउल्ला यांचा जन्म. (मृत्यू: 29 मे 1892 – आक्रा, इस्त्राएल).

1866 : चीन प्रजासत्ताक चे पहिले अध्यक्ष सन यट-सेन यांचा जन्म. (मृत्यू: 12  मार्च 1925).

1880 : सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक पांडुरंग महादेव तथा ‘सेनापती बापट’ यांचा पारनेर, जि.अहमदनगर येथे जन्म. (मृत्यू: 28 नोव्हेंबर 1966).

1889 : रीडर डायजेस्टचे सह्संथापक डेव्हिट वॅलेस यांचा जन्म. (मृत्यू: 30 ऑगस्ट 1981).

1896 : जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक डॉ. सलीम अली यांचा जन्म. (मृत्यू: 27 जुलै 1987).

1904 : समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू  श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी यांचा जन्म. (मृत्यू: 1 एप्रिल 1989).

1940: हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक अमजद खान यांचा जन्म. (मृत्यू: 27 जुलै 1992 – मुंबई).

मृत्यूदिन:

1946 : बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक पण्डित मदन मोहन मालवीय यांचे निधन. (जन्म: 25 डिसेंबर 1861).

1959 :  अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर यांचे निधन. (जन्म: 18 ऑगस्ट 1886).

1959 : स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचे निधन. यांचे निधन. केशवराव व बाबूराव याबंधूंचा सत्यशोधक चळवळीकडे ओढा होता. त्यांनी ’मजूर’ हे वृत्तपत्र काढले. (जन्म: 9 मे 1886).

1969 : इस्कंदर मिर्झा – पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती (जन्म: 13 नोव्हेंबर 1898).

1997 : वेदाध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले आचारनिष्ठ घनपाठी वेदाचार्य विनायक भट्ट घैसास गुरुजी यांचे पुणे येथे निधन.

2005 : रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ प्रा. मधू दंडवते यांचे निधन. (जन्म: 21 जानेवारी 1924).

2007 : भारतीय क्रिकेटर के. सी. इब्राहिम यांचे निधन. (जन्म: 26 जानेवारी 1919).

2014 : भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते रवी चोप्रा यांचे निधन. (जन्म: 27 सप्टेंबर1946).

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here