13 November Dinvishesh – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
13 November Dinvishesh
13 November Dinvishesh

13 November Dinvishesh 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (13 November Dinvishesh):

1841 : जेम्स ब्रॅडी यांना प्राण्यांच्या आकर्षणामुळे संमोहन विषयावर अभ्यास करण्याला प्रोत्साहन मिळाले.

1864 : ग्रीस देशाने नवीन संविधान स्वीकारले जाते.

1913 : रवीन्द्रनाथ टागोर यांना स्वीडिश एकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर केले.

1921 : वामनराव पटवर्धनांनी पुढाकार घेऊन पुण्यास अखिल भोर संस्थान प्रजा सभा स्थापन केली.

1931 : शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांनी मोनोटाईप मशीनवर देवनागरी लिपीची यांत्रिक जुळणी यशस्वी केली.

1947 : सोव्हिएत युनियनने एके 47 बंदुक तयार केली.

1970 : बांगला देशात आलेल्या भयानक चक्रीवादळात एका रात्रीत सुमारे 5,00,000 लोक मृत्यूमुखी पडले. ही विसाव्या शतकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती होती.

1994 : स्वीडनमधे घेतलेल्या सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला.

2012 : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण प्रशांत महासागराच्या काही भागात पूर्ण सूर्यग्रहण झाले.

जन्मदिन:

1780 : शिख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजितसिंग यांचा जन्म. (मृत्यू: 27 जुन 1839)

1850 : इंग्लिश लेखक व कवी आर. एल. स्टीव्हनसन यांचा जन्म. (मृत्यू: 3 डिसेंबर 1893)

1855 : आद्य मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म. व स्वतंत्र मराठी लेखन आणि इंग्रजी, फ्रेन्च व संस्कृत नाटकांची भाषांतरे इ. अनेक प्रकार त्यांनी हाताळले होते. (मृत्यू: 14 जुन 1916)

1873 : कायदेपंडित, पं. मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर यांचा जन्म. (मृत्यू: 10 मार्च 1959)

1898 : पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा यांचा जन्म. (मृत्यू: 13  नोव्हेंबर 1969)

1917 : महाराष्ट्राचे 5 वे व 9 वे मुख्यमंत्री व सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ वसंतदादा पाटील यांचा जन्म. (मृत्यू: 1 मार्च 1989)

1917 : हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक गजानन माधव मुक्तिबोध यांचा जन्म. (मृत्यू: 11 सप्टेंबर 1964)

1954 : सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक स्कॉट मॅकनीली यांचा जन्म.

1967 : अभिनेत्री जूही चावला यांचा जन्म.

मृत्यूदिन:

1740 : प्राचीन मराठी कवी कृष्णदयार्णव यांचे निधन. त्यांचा ’हरिवरदा’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. (जन्म: 1674)

1956 : शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचे निधन. (जन्म: 1  नोव्हेंबर 1893 – मेखलीगंज, कुच बिहार, पश्चिम बंगाल)

2001 : ज्येष्ठ लेखिका अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचे निधन. ललित, वैचारिक, नाट्य, काव्य आदी विविध प्रकारांत मोठ्या प्रमाणावर लेखन करणार्‍या लेखिका. ’दुर्दैवाशी दोन हात’ या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाला 1975 मधे राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. (जन्म: 15 ऑगस्ट 1917).

2002 : नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते ऋषिकेश साहा यांचे निधन.

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here