15 November Dinvishesh – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
15 November Dinvishesh
15 November Dinvishesh

15 November Dinvishesh 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (15 November Dinvishesh):

1945 : व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

1949 : महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी.

1971 : इंटेल कंपनी ने जगातील पहिले व्यावसायिक मायक्रोप्रोसेसर चीप 4004 प्रकाशित केले.

1989 : सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.

1996 : भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा ’सासाकावा पर्यावरण पुरस्कार’ जाहीर. पर्यावरणाचे रक्षण आणि नियोजन या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.

1999 : रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते शिवसनर्थ पुरस्कार प्रदान.

2000 : देशाचे 28 वे राज्य म्हणून झारखंड हे राज्य अस्तित्त्वात आले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून भाजपचे बाबूलाल मरांडी यांनी शपथ घेतली.

जन्मदिन:

1738 : जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार विल्यम हर्षेल यांचा जन्म. 1738 मधे त्याने युरेनस ग्रहाचा शोध लावला. (मृत्यू: 25 ऑगस्ट 1822)

1875 : झारखंड मधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा जन्म. (मृत्यू: 9 जून 1900)

1885 : आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते गिजुभाई बधेका यांचा जन्म. (मृत्यू: 23 जून 1939 – भावनगर, गुजराथ)

1891 : जर्मन सेनापती एर्विन रोमेल यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑक्टोबर 1944)

1908 : अबार्थ कंपनी चे संस्थापक कार्लो अबार्थ यांचा जन्म. (मृत्यू:  24 ऑक्टोबर 1979)

1917 : संगीतकार दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ डी. डी यांचा जन्म. (मृत्यू: 19 सप्टेंबर 2007)

1914 : भारतीय वकील आणि न्यायाधीश व्ही. आर. कृष्णा अय्यर यांचा जन्म. (मृत्यू: 4 डिसेंबर 2014)

1927 : आग्रा घराण्याच्या 11 व्या पिढीतील गायक उस्ताद युनुस हुसेन खाँ यांचा जन्म. (मृत्यू: 29 सप्टेंबर 1991)

1929 : कवयित्री शिरीष पै यांचा जन्म.

1936 : भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचा जन्म. (मृत्यू: 18 नोव्हेंबर 1998)

1948 : कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक सुहास शिरवळकर यांचा जन्म. (मृत्यू: 11 जुलै 2003)

1986 : लॉन टेनिस खेळाडू सानिया मिर्झा यांचा जन्म.

मृत्यूदिन:

1630 : जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ योहान केपलर यांचे निधन. (जन्म: 27 डिसेंबर 1571)

1706 : 6 वे दलाई लामा यांचे निधन. (जन्म: 1 मार्च 1683)

1949 : महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील प्रमुख आरोपी नथुराम गोडसे यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1910)

1949 : महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी नारायण दत्तात्रय आपटे यांचे निधन.

1982 : भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य आचार्य विनोबा भावे यांचे निधन. भारतरत्‍न – 1983 मरणोत्तर, 1940 मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली. (जन्म:  11 सप्टेंबर 1895).

1996 : कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माधवराव सूर्याजी पवार यांचे निधन.

2012 : केन्द्रीय मंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष कृष्ण चंद्र पंत यांचे निधन. (जन्म: 10 ऑगस्ट 1931).

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here