17 November Dinvishesh – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
17 November Dinvishesh
17 November Dinvishesh

17 November Dinvishesh 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (17 November Dinvishesh):

1831 : ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्‍वेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.

1869 : भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणार्‍या सुएझ कालव्याचे उद्‍घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र 10 वर्षे आधीच पूर्ण झाले होते.

1932 : तिसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

1933 : अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली.

1950 : ल्हामो डोंड्रब हे अधिकृतपणे 14 वे दलाई लामा बनले.

1992: देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.

1992 : महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.

1994 : रशियाच्या मीर या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती 50,000 फेर्‍या पूर्ण करून नवा विक्रम केला.

1996 : पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या नॅशनल अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सेस चे फेलो म्हणून निवड.

जन्मदिन:

0009 : रोमन सम्राट व्हेस्पासियन यांचा जन्म. (मृत्यू: 23 जुन 0079)

1749 : कॅनिंग चे निर्माते निकोलस एपर्टीट यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1841)

1755 : फ्रान्सचा राजा जन्म लुई (अठरावा) यांचा जन्म. (मृत्यू: 16 सप्टेंबर 1824)

1901 : युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष वॉल्टर हॉलस्टेन यांचा जन्म. (मृत्यू: 29 मार्च 1982)

1906 : होंडा मोटर कंपनी चे सहसंस्थापक सोईचिरो होंडा यांचा जन्म. (मृत्यू: 5 ऑगस्ट 1991)

1920 : भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मिथुन गणेशन यांचा जन्म. (मृत्यू: 22 मार्च 2002)

1923 : केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष अरिसिदास परेरा यांचा जन्म. (मृत्यू: 22 सप्टेंबर 2011)

1925 : अमेरिकन अभिनेता रॉक हडसन यांचा जन्म. (मृत्यू: 2 ऑक्टोबर 1985)

1932 : अभिनेत्री शकुंतला महाजन तथा बेबी शकुंतला यांचा जन्म. लोभसवाणे रूप, शालीन सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत ​अमीट अशी मुद्रा उमटविणाऱ्या अभिनेत्री.  

वयाच्या 82 व्या वर्षी ही ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली. आणि त्यांच्या रूपाने सिनेमाचा चालता बोलता इतिहासच लुप्त झाला. बेबी शकुंतला यांनी मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवला. (मृत्यू: 18 जानेवारी 2015 – कोल्हापूर)

1938 : लेखक, नाटककार, निर्माते रत्‍नाकर मतकरी यांचा जन्म.

1982 : भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचा जन्म.

स्मृतिदिन:

1812 : द टाईम्स वृत्तपत्र चे संस्थापक जॉन वॉल्टर यांचे निधन.

1928 : स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी लाला लजपतराय यांचे निधन. (जन्म: 28 जानेवारी 1865)

1931 : संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचे निधन. (जन्म: 6 डिसेंबर 1853)

1935 : भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचे निधन. वक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य, ’सेवासदन’ या संस्थेचे शिल्पकार, सहकारी चळवळीचे आद्य समर्थक (जन्म: 21 ऑगस्ट 1871)

1961: साहित्यिक व समीक्षक कुसुमावती आत्माराम देशपांडे यांचे निधन. ग्वाल्हेर येथील 43 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा (जन्म: 10 नोव्हेंबर 1904)

2003 : भारतीय गायक सुरजित बिंद्राखिया यांचे निधन. (जन्म: 15 एप्रिल 1964)

2012 : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निधन. (जन्म: 23जानेवारी 1926)

2012: भारतीय उद्योगपती पॉंटि चड्डा यांचे निधन. (जन्म: 22  ऑक्टोबर 1957)

2015 : विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचे निधन.

2015 : कर्नल संतोष महाडिक कुपवाडा श्रीनगर येथे कोम्बिंग ऑपरेशनचे नेतृत्व करताना शहीद.

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here