19 November Dinvishesh – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
19 November Dinvishesh
19 November Dinvishesh

19 November Dinvishesh 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (19 November Dinvishesh):

1946 : अफगणिस्तान, आइसलँड आणि स्वीडनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

1960 : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना.

1969 : फूटबॉलपटू पेले यांनी 1,000 वा गोल केला.

1969 : अपोलो-12 या अमेरिकन अंतराळयानातुन चार्ल्स कॉनराड आणि अ‍ॅलन बिल हे चंद्रावर उतरले.

1998 : व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे द पोर्ट्रेट ऑफ अ‍ॅन आर्टिस्ट विदाऊट अ बेअर्ड हे चित्र 7.15 कोटी डॉलर्सना विकले गेले.

1998 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालू.

1999: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते ढाक्क्याचे डॉ. मोहम्मद युनूस यांना देण्यात आला.

2000 : शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना प्रदान.

जन्मदिन:

1722 : आधुनिक स्टेथॅस्कोपचे जनक लिओपोल्ड अॅव्हेल ग्रुबर यांचा जन्म.

1828 : झाशीच्या राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म. (मृत्यू: 18 जून 1858)

1831 : अमेरिकेचे 20 वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचा जन्म. (मृत्यू: 19 सप्टेंबर 1881)

1838 : ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक केशव चंद्र सेन यांचा जन्म. (मृत्यू: 8 जानेवारी 1884)

1845 : भारतीय-इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक एग्नेस जिबर्ने यांचा जन्म. (मृत्यू: 20 ऑगस्ट 1939)

1875 : प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचा जन्म. (मृत्यू: 13 मे 1950)

1877 : व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलचे संस्थापक ज्युसेप्पे वोल्पी यांचा जन्म. (मृत्यू: 16 नोव्हेंबर 1947)

1888 : क्यूबाचा बुद्धीबळपटू जोस रॉल कॅपाब्लांका यांचा जन्म. (मृत्यू: 8 मार्च 1942)

1897 : सह्याद्री ग्रंथांचे लेखक व कायदेपंडित स.आ. जोगळेकर यांचा जन्म.

1909 : ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक पीटर ड्रकर यांचा जन्म. (मृत्यू: 11 नोव्हेंबर 2005)

1914 : क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार एकनाथजी रामकृष्ण रानडे यांचा जन्म. अधिकाधिक लोकांचा सहभाग असावा म्हणून मोठमोठ्या देणग्या जमा न करता एक एक रुपया जमा करुन त्यांनी विवेकानंद शिला स्मारकाचे प्रचंड काम उभे केले आहे. (मृत्यू: 22 ऑगस्ट 1982)

1917 : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्म. (मृत्यू: 31 ऑक्टोबर 1984)

1922 : हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार सलील चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: 5 सप्टेंबर 1995 – मुंबई)

1928 : मुष्टीयोद्धा आणि अभिनेता दारा सिंग यांचा जन्म. (मृत्यू: 12 जुलै 2012)

1938 : टर्नर ब्रॉडकास्टिंग सिस्टमचे संस्थापक टेड टर्नर यांचा जन्म.

1942: केल्विन क्लेन इंक चे संस्थापक केल्विन क्लेन यांचा जन्म.

1951 : हिंदी चित्रपट अभिनेत्री झीनत अमान यांचा जन्म. (मिस एशिया-पॅसिफिक-1970)

1974 : भारतीय अभिनेते आणि गायक अरुण विजय यांचा जन्म.

1975 : मिस युनिव्हर्स (1994) आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सुष्मिता सेन यांचा जन्म.

1976 : ट्विटर चे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांचा जन्म.

स्मृतिदिन:

1883 : जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता सर कार्ल विल्हेम सिमेन्स यांचे निधन. अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणारी ’सिमेन्स’ ही बलाढ्य कंपनी त्याच्याच भावाने स्थापन केली आहे. (जन्म: 4 एप्रिल 1823)

1971 : मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक कॅप्टन गो. गं. लिमये यांचे निधन. मुंबईत आरोग्याधिकारी असताना हिवतापाला कारणीभूत होणार्‍या डासांवर अभ्यास करुन त्यांनी ’डास तो काय?’ अशा पुस्तकांची मालिका लिहिली होती.

1976 : कोव्हेन्ट्री कॅथेड्रल चे रचनाकार बॅसिल स्पेन्स  यांचे निधन. (जन्म: 13 ऑगस्ट 1907)

1999 : कीर्तनकार व प्रवचनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक रामदास कृष्ण धोंगडे यांचे निधन.

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here