20 November Dinvishesh – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
20 November Dinvishesh
20 November Dinvishesh

20 November Dinvishesh 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (20 November Dinvishesh):

1789 : न्यूजर्सी अमेरिकेचे पहिले राज्य बनले.

1877 : थाॅमस अल्वा एडिसन यांनी ग्रामोफोन चा शोध लावला.

1917 : युक्रेन प्रजासत्ताक बनले.

1945 : न्युरेम्बर्ग ट्रायल्स – दुसर्‍या महायुद्धातील गुन्ह्यांसाठी 24 जणांवर खटला सुरू झाला.

1959 : युनायटेड नेशन्सने बालहक्कांच्या घोषणापत्राची दखल घेतली.

1985 : मायक्रोसॉफ्ट विंडोज 1.0 प्रकाशीत झाले.

1994 : भारताची ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड किताबाची मानकरी बनली.

1997 : अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली.

1998 : इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’चे (ISS) प्रक्षेपण झाले.

1999 : अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा हॅरी होल्ट पुरस्कार लता जोशी यांना जाहीर.

1999 : आर. जी. जोशी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मोरोपंत पिंगळे यांना जाहीर.

2008 : अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे डाऊ जोन्स निर्देशांक 1997 पासुनच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.

जन्मदिन:

1602 : जर्मन भौतिकशास्त्रज्ञ ऑट्टो फोन ग्वेरिक यांचा जन्म.

1750 : म्हैसूर चा राजा शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान यांचा जन्म. (मृत्यू: 5 मे 1799).

1854 : कवी, निबंधकार व नाटकाकर मोरो गणेश लोंढे यांचा जन्म.

1889 : अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांचा जन्म. (मृत्यू: 28 सप्टेंबर 1953).

1892 : इंसुलिन चे सह्संशोधक जेम्स कॉलिप यांचा जन्म. (मृत्यू:  19 जून 1965).

1905: संसदपटू, अर्थतज्ञ, घटनापंडित मिनोचर रुस्तुम तथा मिनू मसानी यांचा जन्म. (मृत्यू: 27 मे 1998)

1910 : डच भौतिकशास्त्र विलेम जेकब व्हान स्टाॅकम यांचा जन्म.

1924 : फ्रेंच गणितज्ञ बेनुवा मँडेलब्रॉट यांचा जन्म.

1927 : न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म. मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, वकील, लेखक, स्वातंत्र्यसैनिक, पद्मभूषण.

1939 : साहित्यिक वसंत पोतदार यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल 2003– नाशिक)

1941 : उर्दू लेखिका हसीना मोईन यांचा जन्म.

1963 : इंग्लिश गणितज्ञ तिमोथी गॉवर्स यांचा जन्म.

1969 : अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांचा जन्म.

स्मृतिदिन:

1859 : स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1779).

1908 : बंगालमधील सुप्रसिद्ध क्रांतिकारक कन्हय्यालाल दत्त यांना फाशी.

1910 : रशियन साहित्यिक लिओ टॉलस्टॉय यांचे निधन. (जन्म: 9 सप्टेंबर 1928).

1954 : सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक क्लाइड व्हर्नन सेसेना यांचे निधन. (जन्म: 5 डिसेंबर 1879).

1970 : ख्यातनाम मराठी संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचे निधन. (जन्म: 14 जुलै 1884).

1973 : पत्रकार व समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे यांचे निधन. (जन्म: 17 सप्टेंबर 1885).

1984 : लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचे निधन. (जन्म: 13 फेब्रुवारी 1911).

1989: किरण घराण्याच्या प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांचे निधन. (जन्म: 19 मे 1905 – बडोदा).

1997 : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे स्वीय सहाय्यक शांताराम शिवराम तथा आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.

1998 : संस्कृतच्या विविध शास्त्रांतील पंडित, प्रख्यात मीमांसक दत्तात्रेयशास्त्री तांबे गुरूजी यांचे निधन.

1999 : तमाशा कलावंत (सोंगाड्या) दत्ता महाडिक पुणेकर यांचे निधन.

2003 : सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचे पहिले राष्ट्राध्यक्ष डेव्हिड डेको यांचे निधन. (जन्म: 24  मार्च 1930).

2007 : रोडेशिया देशाचे पहिले पंतप्रधान इयान स्मिथ यांचे निधन. (जन्म: 8 एप्रिल 1919). 

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here