21 November Dinvishesh – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
21 November Dinvishesh
21 November Dinvishesh

21 November Dinvishesh 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (21 November Dinvishesh):

1877 : थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.

1911 : संसदेच्या निवडणुकीत उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हुणुन लंडनमध्ये स्त्रियांनी केलेल्या मोर्च्यावर व्हाईट हॉल येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठी हल्ला केला.

1942 : राजा नेने दिग्दर्शित दहा वाजता हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

1955 : संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.

1962 : भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.

1962 : भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्‍या चीनने 19 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.

1971 : बांगलादेश मुक्ती संग्राम – भारतीय सैन्य व बांगलादेश मुक्ती वाहिनी यांनी गरीबपूरच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याचा दारुण पराभव केला.

1972 : दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.

जन्मदिन:

1694 : फ्रेंच तत्त्वज्ञानी व्हॉल्तेर यांचा जन्म. (मृत्यू: 30 मे 1778).

1899 : ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्णा महाबत यांचा जन्म. (मृत्यू: 2 जानेवारी 1987).

1910 : चीनी भाषेतील लेखक छ्यान चोंग्शू यांचा जन्म.

1926 : हिंदी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते प्रेम नाथ यांचा जन्म. (मृत्यू: 3 नोव्हेंबर 1992).

1927 : नाटककार शं. ना. नवरे यांचा जन्म. (मृत्यू: 25 सप्टेंबर 2013).

स्मृतिदिन:

1908 : देशभक्त सत्येंद्रनाथ बोस यांना अलीपूर कारागृहात फाशी.

1963 : प्रसिद्ध विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचे निधन. (जन्म: 19 जानेवारी 1892).

1970 : नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरमण (सी. व्ही. रमण) यांचे निधन. (जन्म: 7 नोव्हेंबर 1888).

1996 : भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते एकमेव पाकिस्तानी डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम यांचे निधन. (जन्म: 29 जानेवारी 1926 – संतोकदास, साहिवाल, पंजाब, पाकिस्तान).

1997 : आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.

2015 : भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी अमीन फहीम यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1939).

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here