24 November Dinvishesh – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
24 November Dinvishesh
24 November Dinvishesh

24 November Dinvishesh 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (24 November Dinvishesh):

1859 : चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ओरिजिन ऑफ द स्पिशिज प्रकाशित केला.

1864 : जळगाव नगरपालिकेची स्थापना.

1944 : दुसरे महायुद्ध – 88 अमेरिकन विमानांनी टोकियोवर तुफानी बॉम्बवर्षाव केला.

1963 : जॉन एफ. केनेडी यांचा खून करणाऱ्या ली. हार्वे ऑसवाल्ड याचा डॅलस पोलीस स्थानकात जॅक रुबी ने खून केला.

1969: अपोलो-12 चंद्रावर उतरले.

1971 : डी. बी. कुपर याने चोरलेल्या 2 लाख अमेरिकन डॉलर सह नॉर्थवेस्ट ओरीएंट एरलाईन्सच्या विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली. परंतु कुपारचा अद्याप शोध लागलेला नाही.

1976 : तुर्कस्तान च्या पूर्व भागात भीषण भूकंप. यात 4 ते 5 हजार लोकांचे निधन.

1992 : कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर.

१९९२: वैज्ञानिक संशोधनासाठीचा जी. डी. बिर्ला पुरस्कार हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना जाहीर.

1992 : देवगड तालुक्यातील कवी माधव यांना पहिला कवी माधव पुरस्कार जाहीर.

1996 : इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा आशुतोष मुकर्जी स्मृती पुरस्कार ख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर.

1998 : समाजसेविकांना दिला जाणारा अहल्यादेवी होळकर पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना प्रदान.

2000 : भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी 545 किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले.

जन्मदिन:

1806 : रग्बी फुटबॉलचे निर्माते विल्यम वेबल एलिस यांचा जन्म. (मृत्यू: 24 जानेवारी 1872).

1877 : भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडीकमिशनर कावसजी जमशेदजी पेटीगरा यांचा जन्म.

1894 : इंग्लिश क्रिकेटपटू हर्बर्ट सटक्लिफ यांचा जन्म. (मृत्यू: 22 जानेवारी 1978).

1914 : ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचा जन्म. ब्रिटिश शिल्पकार, लोखंड, पोलाद, पितळ, प्लॅस्टर, काच आदी माध्यमांचा उपयोग करुन त्यांनी शिल्पे घडविली. (मृत्यू: 25 एप्रिल 2003) .

1937 : मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार आणि समीक्षक केशव मेश्राम यांचा जन्म.

1941 : भारतीय-इंग्लिश ड्रमर आणि गीतकार पेट बेस्ट यांचा जन्म.

1955 : इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बोथम यांचा जन्म.

1961 : लेखिका व मानवाधिकार कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांचा जन्म.

स्मृतिदिन:

1937 : नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: 30 नोव्हेंबर 1858).

1959 : अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: 12 मार्च 1891).

1970 : सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष युसूफ बिन इशक यांचे निधन. (जन्म: 12 ऑगस्ट 1910).

1979 : भारतीय-अमेरिकन अभिनेत्री मरले ओबर्नॉन यांचे निधन. (जन्म: 19 फेब्रुवारी 1911).

1993 : पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे होणार्‍या वैश्विक किरणांच्या विकीरणा विषयी संशोधन करणारे इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचे निधन. (जन्म: 13 एप्रिल 1905 – व्हेनिस, ईटली).

1999 : अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या कुमुद सदाशिव पोरे यांचे निधन.

2000 : चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक बाबूराव सडवेलकर यांचे निधन. (जन्म: 28 जून 1928 – सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र).

2006 : झेटा मासिकचे सहसंस्थापक जेस ब्लॅंकोनेलसला  यांचे निधन. (जन्म: 14 नोव्हेंबर 1936).

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here