25 November Dinvishesh – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
25 November Dinvishesh
25 November Dinvishesh

25 November Dinvishesh 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (25 November Dinvishesh):

1664 : छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.

1922 : मधुमेह या आजारावरील इन्सुलिन चा शोध फ्रेडरिक बँटिंगनी यांनी जाहीर केला.

1948 : नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.

1975 : सुरीनामला नेदरलँड्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

1981 : अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.

1991 : कमल नारायण सिंग यांनी भारताचे 22 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

1994 : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनतर्फे देण्यात येणारा राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार जाहीर.

1999 : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

2000 : सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.

जन्मदिन:

1841: जर्मन गणितज्ञ आर्न्स्ट श्रोडर यांचा जन्म.

1844 : मर्सिडीज-बेंझ चे संस्थापक कार्ल बेंझ यांचा जन्म. (मृत्यू: 4 एप्रिल 1929)

1872 : ख्यातनाम नाटककार व पत्रकार, केसरी चे संपादक, नवाकाळ चे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म. (मृत्यू: 26 ऑगस्ट 1948)

1879 : आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचा जन्म. (मृत्यू: 16 जानेवारी 1966)

1822 : मराठी चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचा जन्म. (मृत्यू: 30 मे 1968)

1898 : भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक देबाकी बोस यांचा जन्म.

1921 : नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.

1926 : भारताचे 21 वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: 13 सप्टेंबर 2012)

1935 : महाराष्ट्रीय हॉकीपटू गोविंद सावंत यांचा जन्म.

1939 : मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादक उस्ताद रईस खान यांचा जन्म.

1952 : पाकिस्तानचा क्रिकेटपटू इम्रान खान यांचा जन्म.

1972 : भारतीय क्रिकेटपटू दीपा मराठे यांचा जन्म.

1983 : भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामी यांचा जन्म.

स्मृतिदिन:

1885 : स्पेनचा राजा अल्फान्सो (बारावा) यांचे निधन. (जन्म: 28 नोव्हेंबर 1857)

1922 : प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचे निधन. (जन्म: 20 मे 1884 – राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र)

1960: प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचे निधन. (जन्म: 24 सप्टेंबर 1898)

1962 : आधुनिक संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज यांचे निधन. (जन्म: 6 जानेवारी 1868 – अकोळनेर, अहमदनगर)

1974 : संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस उ. थांट यांचे निधन. (जन्म: 22 जानेवारी 1909)

1984 : भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निधन. (जन्म: 12 मार्च 1913)

1997 : लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे निधन.

1997: मलावी देशाचे पहिले अध्यक्ष हेस्टिंग्ज बांदा यांचे निधन. (जन्म: 14 मे 1898).

1998  प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर यांचे निधन. (जन्म: 4 सप्टेंबर 1913 – गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान).

2013 : बालसाहित्यिका लीला पोतदार तथा लीलावती भागवत यांचे निधन. (जन्म: 5 सप्टेंबर 1920).

2014 : भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर सितारा देवी यांचे निधन. (जन्म: 8 नोव्हेंबर 1920).

2016 : क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ यांचे निधन. (जन्म: 13 ऑगस्ट 1926).

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here