26 November Dinvishesh – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
26 November Dinvishesh
26 November Dinvishesh

26 November Dinvishesh 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (26 November Dinvishesh):

1863 : अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर 26 हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला.

1941 : लेबेनॉन हा देश स्वतंत्र झाला.

1949 : भारताची संविधान घटना मंजूर झाली.

1949 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.

1965 : अ‍ॅस्टॅरिक्स (A-1) हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.

1982 : दिल्ली येथे 9 वी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली.

1997 : अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि पंतप्रधानांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर

1998 : खाणा रेल्वे अपघातात 212 जणांचा मृत्यू झाला.

1999 : विकीरण जीवशास्त्र (Radiation Biology) या विषयात महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणार्‍या पुरस्कारासाठी डॉ. रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.

2008 : महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला.

2008 : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना लष्कर-ए-तैय्यबा ने मुंबई येथे दहशदवाद्याचा आतंकवादी हल्ला. या घटनेला 26/11 म्हणून ओळखले जाते.

जन्मदिन:

1885 : वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक देवेन्द्र मोहन बोस यांचा जन्म. (मृत्यू: 2 जून 1975)

1890 : भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक सुनीतिकुमार चटर्जी यांचा जन्म. (मृत्यू: 29 मे 1977)

1898 : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायन शास्रज्ञ कार्ल झीगलर यांचा जन्म.

1902 : मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: 11 डिसेंबर 1971)

1904 : भारतीय कवि, विद्वान, लेखक, तत्वज्ञानी के. डी. सेठना यांचा जन्म. (मृत्यू: 29 जून 2011)

1919 : भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: 20 ऑगस्ट 2011)

1921 : भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष व्हर्गिस कुरियन यांचा जन्म. (मृत्यू: 9 सप्टेंबर 2012 – नडियाद, गुजराथ)

1923 : चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: 28 जुलै 1975 – मुंबई)

1923 : भारतीय सिनेमॅटोग्राफर व्ही. के. मूर्ति यांचा जन्म. (मृत्यू: 7 एप्रिल 2914)

1924 : भारतीय क्रिकेटपटू जसुभाई पटेल यांचा जन्म.

1926 : भारतीय राजकारणी रवी रे यांचा जन्म.

1926 : कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म.

1938 : ऑस्ट्रेलियन भौतिकशास्रज्ञ रॉडनी जोरी यांचा जन्म.

1939 : अमेरिकन-स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका टीना टर्नर यांचा जन्म.

1949 : पूर्व तिमोर देशाचे पहिले पंतप्रधान मारी अल्कातीरी यांचा जन्म.

1954 : एल. टी. टी. ई. चे संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचा जन्म. (मृत्यू: 18  मे 2009)

1961 : कोबरा बीयरचे सहसंस्थापक करण बिलिमोरिया यांचा जन्म.

1972 : हिंदी चित्रपट अभिनेते अर्जुन रामपाल यांचा जन्म.

1983 : फेसबुकचे सहसंस्थापक क्रिस ह्यूजेस यांचा जन्म.

स्मृतिदिन:

1985 : कवी यशवंत तथा दिनकर पेंढारकर यांचे निधन. (जन्म: 9 मार्च 1899)

1994 : चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचे निधन. (जन्म: 2 मे 1899)

1999 : पुण्यातील जनता सहकारी बँकेचे संस्थापक संचालक दत्तात्रय शंकर जमदग्नी यांचे निधन.

2001 : शिल्पकार चंद्रकांत कृष्णाजी जगताप यांचे निधन.

2008 : मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामते यांच्यासह 17 पोलीस कर्मचारी शहीद.

2012 : भारतीय लेखक आणि अनुवादक एम सी सी नंबुदीपदी यांचे निधन. (जन्म: 2 फेब्रुवारी 1919)

2016 : रशियन विमान मिग-29 चे सह-निर्माता आणि डिझायनर इव्हान मिकोयान यांचे निधन.

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here