28 November Dinvishesh – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
28 November Dinvishesh
28 November Dinvishesh

28 November Dinvishesh 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (28 November Dinvishesh):

1612 : गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. मात्र तेव्हा त्याला तो तारा आहे असे वाटले होते.

1821 : पनामाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.

1836  : स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

1846  : आयोवा हे अमेरिकेचे (USA) 29 वे राज्य बनले.

1885 : मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना.

1895 : ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला. या खेळाचे तिकीट होते एक फ्रँक. पहिल्या खेळाचे उत्पन्न आले फक्त 35 फ्रँक. मात्र नंतर तो खेळ एवढा लोकप्रिय झाला की आठवडाभरातच त्याचे दिवसाला 20 खेळ होऊन दिवसाला 2000 फ्रँक एवढे भरघोस उत्पन्न मिळू लागले. ल्युमिअर बंधू

1938 : प्रभात चा माझा मुलगा हा चित्रपट रिलीज झाला.

1960 : मॉरिटानियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.

1964 : नासा (NASA) चे मरीनर-4 हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.

1967 : जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी पल्सार तार्‍यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.

1975 : पूर्व तिमोरला पोर्तुगालपासुन स्वातंत्र्य मिळाले.

2000 : तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.

जन्मदिन:

1853 : डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला हेलन व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: 28 ऑक्टोबर 1944).

1856 : अमेरिकेचे 28 वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते वूड्रो विल्सन यांचा जन्म. (मृत्यू: 3 फेब्रुवारी 1924).

1857 : स्पेनचा राजा अल्फान्सो (बारावा) यांचा जन्म. (मृत्यू: 25 नोव्हेंबर 1885).

1872 : गायक नट रामकृष्णबुवा वझे यांचा जन्म. (मृत्यू: 5 मे 1943).

1899 : कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर यांचा जन्म. (मृत्यू: 27 नोव्हेंबर 1976).

1911 : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचा जन्म. दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या ’रामायण’ या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती. चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या वाटचालीत त्यांनी केवळ हिन्दीतच नव्हे तर चिनी, बंगाली, मल्याळी, उडिया व इंग्रजी चित्रपटांच्या निर्मितीत मोठे नाव कमावले. (मृत्यू: 16 मे 1994).

1926 : हुतात्मा शिरीषकुमार यांचा जन्म. (मृत्यू: 10 ऑगस्ट 1942).

1932 : उद्योगपती धीरुभाई अंबानी यांचा जन्म.(मृत्यू: 6 जुलै 2002).

1937 : उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म.

1940 : भारताचे परराष्ट्रमंत्री ए. के. अँटनी यांचा जन्म.

1945 :  नेपाळचे राजे वीरेंद्र यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 2001).

1952 : केंद्रीय मंत्री व वकील अरुण जेटली यांचा जन्म. (मृत्यू : 24 ऑगस्ट, 2019 एम्स, नई दिल्ली, दिल्ली) .

1964: भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी मायकल बेनेट यांचा जन्म.

स्मृतिदिन:

1663 : इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी यांचे निधन. (जन्म: 2 एप्रिल 1618).

1890 : श्रेष्ठ समाजसुधारक जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचे निधन. (जन्म: 11 एप्रिल 1827).

1893: ब्रिटिश अधिकारी सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचे निधन. (जन्म: 23 जानेवारी 1814).

1931 : चित्रकार आबालाल रहमान यांचे निधन. (जन्म : 1860).

1939 : बास्केटबॉल चे निर्माते जेम्स नेस्मिथ यांचे निधन. (जन्म: 6 नोव्हेंबर 1861).

1954 : नोबेल पारितोषिक विजेते इटालियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांचे निधन. (जन्म: 29 सप्टेंबर 1901).

1962 : गायक, संगीत संयोजक व अभिनेते कृष्ण चंद्र तथा के. सी. डे यांचे निधन.

1963 : इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचे निधन. (जन्म: 25 मे 1895).

1967 : सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट यांचे निधन. (जन्म: 12 नोव्हेंबर 1880).

1968 : बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका एनिड ब्लायटन यांचे निधन. (जन्म: 11 ऑगस्ट 1897).

1977 : छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी सुमित्रानंदन पंत यांचे निधन. (जन्म: 20 मे 1900).

1981 : हिन्दी चित्रपटांत चार दशके चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणारे डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले. (जन्म : 1909).

1999 : अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक हनुमानप्रसाद मिश्रा यांचे निधन.

2000 : तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे यांचे निधन. (जन्म: 24 जानेवारी 1924 – वेंगुर्ला).

2001 : नाटक निर्माते अनंत काणे यांचे निधन.

2006 : संगीतकार व व्हायोलिनवादक प्रभाकर पंडित यांचे निधन. (जन्म: 30 सप्टेंबर 1933).

2012 : अमेरिकन लेखक झिग झॅगलर यांचे निधन. (जन्म: 6 नोव्हेंबर 1926).

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here