6 December Dinvishesh – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
6 december dinvishesh

6 December Dinvishesh 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (6 December Dinvishesh):

1768 : एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

1877 : द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.

1897 : परवाना टॅक्सीकॅब सुरु करणारे लंडन हे जगातील पहिले शहर ठरले.

1917 : फिनलँड रशियापासुन स्वतंत्र झाला.

1971 : भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.

1978 : स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.

1981 : डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली.

1992 : अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे 1,500 लोक ठार झाले.

1999 : जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला ऑलिम्पिक ऑर्डर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

2000 : थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जन्मदिन:

1421 : इंग्लंडचा राजा हेन्‍री (सहावा) यांचा जन्म. (मृत्यू: 21 मे 1471)

1732 : भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचा जन्म. (मृत्यू: 22 ऑगस्ट 1818)

1823 : जर्मन विचारवंत मॅक्स मुल्लर यांचा जन्म. (मृत्यू: 28 ऑक्टोबर 1900)

1853 : संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: 17 नोव्हेंबर 1931)

1861 : कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचा जन्म. (मृत्यू: 9 मे 1919)

1916 : गंधर्व भूषण जयराम शिलेदार यांचा जन्म. (मृत्यू: 6 नोव्हेंबर 1992)

1917 : बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचा जन्म. (मृत्यू: 5 मे 2008)

1923 : लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचा जन्म. (मृत्यू: 15 ऑक्टोबर 2002)

1932 : पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचा जन्म. (मृत्यू: 27 जानेवारी 2007)

1945 : अभितेने शेखर कपूर यांचा जन्म.

1948 : भरतनाट्यम नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांचा जन्म.

1985 : भारतीय क्रिकेटपटू आर. पी. सिंग यांचा जन्म.

स्मृतिदिन:

१८९२: सीमेन्स कंपनीचे संस्थापक वर्नेर व्होंन सीमेन्स यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८१६)

१९५६: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १८९१)

१९७१: भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९०२)

१९७६: पत्री सरकार चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट१९००)

१९९०: मलेशिया देशाचे पहिले पंतप्रधान तुक़ू अब्दुल रहमान यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९०३).

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here