सातबारा (7/12) उतारा म्हणजे काय? सातबारा कशासाठी वापरतात?

0
saat bara utara [mahanews]
mahanews.co.in

जमिन खरेदी किंवा विक्री करताना महत्वाची कागदपत्र म्हणजे सातबारा (7/12). सातबारा 7/12 हा उतारा जमिन कोणाच्या मालकाची आहे म्हणून पुरावा दर्शवतो, पण अंतिम पुराव्यांऐवजी फक्त सुचक पुरावा म्हणून च काम करतो.

आपण नोकरीच्या निमित्ताने किंवा काही कामा निमित्ताने आपण बाहेर म्हणजे शहरा मध्ये राहतो त्यामुळे आपल्याला गावाकडच्या काही गोष्टी माहीत नसतात, गावाकडील जमिनीचे कागदपत्रे माहित नसतात,त्यापैकी सातबारा काय आहे ते एक आहे; कारण ही सर्व कामे आपले वडिलधारया लोकांना जमिनीसंदर्भातल्या थोड्या कायदेशीर बाबी माहित असतात, ते गावात राहत असल्याने त्यंना माहीती असते.

आपली पिढी गावात किंवा त्या क्षेत्रात नसल्याने सातबाराचे उतारे, फेरफारपत्रक, वारसाहक्क व त्याबद्दलची माहिती नसते. तेव्हा आपण सातबारा उतारा हा जमिनीसंदर्भात खुप महत्वाचा कागद असतो.

सातबारा (7/12) चे महत्त्व:

7/12 उतारा जमीनीच्या मालकी हक्क असलेला इतिहास बघता येतो त्यामुळे जमीनीसंबधी मागील काही वाद-विवाद तसेल तर ती माहीती कायदेशीर रीत्या तपासुन घेऊ शकतो.

7/12 मध्ये जमीनीचा वापर कशासाठी झाला आहे व ती शेतजमीन आहे का तसेच कुठल्या प्रकारची पिके घेतली आहेत याविषयी ही माहिती असते.

आपल्या महाराष्ट्रात जिल्हे, तालुके,नगरपालिका, गावे, वाडी यात विभागणी झालेली आहे. यात जे क्षेत्र आहे, या सर्व क्षेत्रात सर्वसाधारणपणे जे जंगलात , नदीत, नाल्यात, डोंगरात, रेल्वे किनारा व समुद्राच्या किनार्‍याच्या हद्दीर्यंतचा जो भाग असतो तो शासनाच्या मालकीचा असतो. इतर राहिलेले जमिनीचे जे क्षेत्र असते ते शेतीसाठी वापरली जातात. त्यात पण वहिवाट-क्षेत्र, पडिक-क्षेत्र, माळरान-क्षेत्र, गावठाण-क्षेत्र अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीचा/क्षेत्राचा समावेश होतो.

7/12 म्हणजे काय?

जमिन खरेदी किंवा मालमत्ता खरेदीसाठी विशेषतः आवश्यक असलेले कागदपत्र म्हणजे सातबारा (7/12). महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी अनेक कागदपत्रांची आवश्यकता आहे. त्यातील एक 7/12 उतारा आहे, ज्याला सातबारा उतारा देखील म्हणतात.

महाराष्ट्र राज्याचा महसूल विभागद्वारे प्रत्येक जिल्ह्यातील जमिनीची नोंद ठेवतात. ही नोंदनी प्रक्रिया 1966  पासुन महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमिन महसूल कायदा अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत नोंदणी केली जाते. यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात.

सातबारा उतारा म्हणजे एक जमिनीचे प्रतिबिंब किंवा आरसाच असतो. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज घरी किंवा ऑफिस मध्ये बसल्या जागी मिळू शकतो. यासाठी तलाठ्याकडे नोंदणीपुस्तके असतात या नोंदणीपुस्तका मध्ये कुळांचे नाव व हक्क, शेतजमिन किती आहे, व पिके कोणते घेतात यां सर्वाचा समावेश असतो.

७/१२ उतारा हा तलाठी मार्फत दिला जातो, पण जमिन खरेदी किंवा विक्रि करायची असेल तर तहसिलदार ऑफिस मध्ये जाऊन करावी लागते. ज्यामध्ये जमीनीचा मालकी हक्क, वहिवाटीचे हक्क , त्याचा सर्वे नंबर, मालकाने खरेदी केलेल्या ची तारीख इत्यादी नमूद केलेली असते.

या दस्तऐवजाचा अर्थ शेती वापरणार आहे त्या मालकाची, आणि जमिनीच्या उत्तरदायित्वाची संबंधित माहिती असते.  हा उतारा प्रत्येक गावासाठी वेग-वेगळा असतो. हा उतारा शेतीसाठी आणि बिगर शेतीसाठी देखील आवश्यक असतो. हा उतारा जमिन कोणाच्या  मालकाची आहे म्हणून पुरावा दर्शवतो, पण अंतिम पुराव्यांऐवजी फक्त  सुचक पुरावा म्हणून च काम करतो.

सातबारा (7/12) उतारा काय दर्शवितो व त्याचे प्रकार?

प्रत्येक जमिनधारकास स्वत:कडे असलेली जमिन किती व कोणती व कशासाठी वापरलेली आहे हे सातबारा उतार्‍यावरून कळू शकते. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे गावचे नमुने नंबर असतात. यापैकी गावचा नमुना नं 7 (फाँर्म 7) आणि गावचा नमुना नं 12 (फाँर्म 12) हे नंबर मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उतार्‍याला सातबारा उतारा असे म्हणतात.

गाव नमुना नं 7 (फाँर्म 7) हे यामध्ये मालक व त्याच्या अधिकाराबद्दलची माहिती व जमीन गहाण टे ली असेल तर त्यांची नावे, हक्क आणि जबाबदारी व या व्यतिरिक्त प्लॉट आणि पीकविषयक माहिती समाविष्ट केलेली असते. व गाव नमुना नं 12 (फाँर्म 12) हे कृषीगुणविशेषाबद्दल तसेच जमीन, पिकाचे प्रकार, लागवडीचे क्षेत्र आणि भूगर्भातील पिकाची माहिती समाविष्ट केलेली असते. जमिनच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात.

सातबारा (7/12) उताऱ्याचे उपयोग:

1). जर कोणत्याही जमीनीवर ती बँकेतून कर्ज किंवा लोन काढले असेल तर बँकेसाठी 7/12 उतारा हा लागतोच व त्याची मागणी सुद्धा बँक वाले करतात.

2). तुम्ही जी जमीन घेणार किंवा घेतली आहे त्या जमीनीपर्यत जाण्यासाठी तेथे रस्ता आहे कि नाही याची माहिती सुद्धा नमुद केलेली असते.

3). जमिनी संदर्भात वाद-विवाद असेल तर कायदेशीररित्या 7/12 वापरून तो आपण मिटवू शकतो.

4). जेव्हा आपण जमीन विकत घेतो तेव्हा ती जमीन आपल्या नावावर होते व त्यांची नोंद एक कायदेशीर कागद म्हणून  7/12 उताऱ्यात दिसते.

7/12 कागदपत्रात खाली दिलेली माहिती असते:

 • क्रमांक
 • आयोग्य शेती क्षेत्र /बिगर शेती क्षेत्र
 • टॅक्स भरणा
 • संपूर्ण आणि सर्वेक्षण टिप्पणी
 • पीक हंगाम /घेतलेल्या पिकाचा प्रकार
 • मालकाव्यतिरिक्त इतर कोणत्याही शेतकऱ्याचे नाव असल्यास
 • सरकारी संस्थांकडून किंवा बँकेकडून जमीनदारांना कर्ज
 • बियाणे, कीटकनाशके किंवा खते खरेदी करण्यासाठी दिलले कर्ज व अनुदान.
 • अधिकार जर वारसकडे असतील तर जमीनीचा वास्तविक ताबा नसलेल्या वारसांची नावे.

7/12 उतारा कसा वाचावा:

 • ज्या गावच्या अंतर्गत जमीन आहे.
 • जिल्हा व तहसीलचा उपविभाग.
 • भुमीमापन क्रमांक: महाराष्ट्र जमीन महसूल नियमनियम 1969 च्या नियम अंतर्गत राज्य महसूल विभागाने प्रदान केलेला सर्वेक्षण क्रमांक.
 • क्षेत्र क्रमांक; सर्वेक्षणच्या क्रमांकाचा उपविभाग.
 • हे पहिले कोणाकडे होते किंवा ते किती क्षेत्र आहे. हा एक महत्वाचा रखना आहे. रहिवासी वर्ग-1 आणि वर्ग-2 प्रकार आहेत. वर्ग-1 रहिवासी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय शेत जमीन हस्तांतरित करू शकतात, तर वर्ग-2 भाडेकरू आहेत ज्यांनी भाडेकरू तत्वाद्वारे 1950 अंतर्गत जमीन खरेदी केली. अशा जमीनीस जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय जमीन हस्तांतरित करू शकत नाहीत.

7/12 च्या संबधी लक्षात ठेवाणारे महत्वाचे मुद्दे:

 • अज्ञान व्यक्ती ची नोंद करताना अ. प.क. म्हणून करतात ती व्यक्ती सज्ञान झाल्यावर फेरफार नोंद न घालता फक्त अर्जावरुन अज्ञानाच्या पालकाचे नांव कमी करता येते.
 • शेतात असणाऱ्या विहीरींची किंवा बोअरवेलची नोंद त्या त्या 7/12 उतार ्या वर “पाणी पुरवठयाचे साधन” या रकान्याखाली करुन घ्या.
 • आपल्या नांवावर असणारी जमिनीची 7/12 प्रमाणे 8अ वर नोंद आहे की नाही हे पाहणे, त्यामुळे सर्व जमिनींचे 7/12 प्रमाणे 8अ यांची तुलना करुन पहाणे गरजेचे आहे.
 • सर्व फळांच्या व झाडांच्या सुद्धा नोंदी नमुना नंबर 12 मध्ये “शेरा” रकान्यात आहे की नाही यांची माहीती करून घ्यावी.
 • जमिनी संदर्भातरगत एक 7/12 उतारा असतो.
 • कोणतीही फेरफारची नोंद झाली असेल तर लगेचच 7/12 वर या नोंद झाली आहे का नाही ते जाणून घेणे गरजेचे आहे.
 • 7/12 दर दहा वर्षांनी पुन्हा लिहिला जातो. खोडून टाकलेल्या सर्व बाबी काढून व शेवटची चालू नोंदीची स्थिति बघून व नोंद करुन 7/12 लिहिला जातो.
 • दरवर्षी पिक पहाणीची नोंद 7/12 वर केली जात केली जाते.

7/12 ऑनलाईन कसे मिळवावे?

हे कागदपत्र तहसीलदारांच्या कार्यालयाकडून मिळू शकते ज्या शहराच्या ताब्यात जमीन आहे त्या शहरावर कार्यक्षेत्र आहे.  इच्छित कालावधीसाठी आपण अर्ज  करून मिळवू शकता.

saat bara extract maha

आपण खाली दिलेल्या स्टेप द्वारे 7/12 उतारा ऑनलाइन काढू शकतो  :-

 • महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळाला भेट द्या किंवा येथे https://bhulekh.mahabhumi.gov.in या लिंकवर क्लिक करा.
 • वेबसाइटवर दिलेल्या यादीतून विभाग, जिल्हा, तालुका व गावचे नाव निवडा.
 • आपण खालील कोणत्याही तपशिलामध्ये अर्क शोधून शोधू शकता.
  • मालमत्तेचा सर्वेक्षण क्रमांक / गट क्रमांक.
  • मालकाचे पहिले नाव.
  • मालमत्तेचा पूर्वज मालक.
  • मालकाचे आडनाव.
  • मालकाचे पूर्ण नाव.
 • फाइंड आऊट आणि 7/12 सबमिट वर क्लिक करा, व वरील विहीत केलेल्या माहिती नुसार 7/12 प्रदर्शित होइल.

अश्याच चांगल्या माहितीसाठी महान्यूज संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here