Age, Nationality and Domicile Certificate in Marathi | वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र मराठी

नमस्कार मित्रांनो, आज आपण वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र ( Age, Nationality and Domicile Certificate ) काढण्यासाठी लागणारी कागतपत्रे यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

कोणत्याही शासकीय कामांसाठी सादर कराव्या लागणाऱ्या प्रमाणपत्रांमध्ये वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. हे प्रमाणपत्र तुम्ही घरी बसून ऑनलाईन पद्धतीने किंवा सेतू केंद्रावर जाऊन काढू शकता.

वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागतो परंतु तहसील कार्यालयात भेट देऊन तुम्ही हे प्रमाणपत्र लवकर देखील काढू शकता.

वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडून तपासणी करून दिले जाते.

चला तर पाहूया वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र ( Age, Nationality and Domicile Certificate ) काढण्यासाठी तुम्हाला 1 ओळखीचा पुरावा, 1 राहण्याचा पुरावा, 1 वयाचा पुरावा, 1 रहिवासी पुरावा, 1 इतर पुरावास्वयं घोषणापत्र सादर करावे लागते.

तर चला जाणून घेऊया या हे पुरावे सादर करण्यासाठी कोणती शासकीय प्रमाणपत्र ग्राह्य धरली जातात.

ओळखीचा पुरावा | Proof of Identity ( कोणताही एक )

 • पॅन कार्ड
 • पासपोर्ट
 • आरएसबीवाय कार्ड
 • आधार कार्ड
 • मतदार ओळखपत्र
 • मनरेगा जॉब कार्ड
 • ड्रायव्हिंग लायसन्स
 • अर्जदाराचा फोटो
 • अर्जदाराची स्वाक्षरी
 • शासकीय किंवा निमशासकीय संस्थांनी जारी केलेले ओळखपत्र

Age, Nationality and Domicile Certificate required Documents 1

राहण्याचा पुरावा | Proof of Address ( कोणताही एक )

 • पासपोर्ट
 • पाणी बिल
 • रेशन कार्ड
 • आधार कार्ड
 • मतदार ओळखपत्र
 • टेलिफोन बिल
 • ड्रायव्हिंग लायसन्स
 • वीज बिल
 • मालमत्ता कराची पावती
 • 7/12 आणि 8 A किंवा भाड्याची पावती

Age, Nationality and Domicile Certificate required Documents 2

इतर पुरावा | Other Documents ( कोणताही एक )

 • पाणी बिल
 • रेशन कार्ड
 • भाड्याची पावती
 • मतदार यादी शुल्क
 • टेलिफोन बिल
 • वीज बिल
 • विवाह प्रमाणपत्र
 • मालमत्ता कराची पावती
 • मालमत्ता नोंदणी शुल्क
 • पतीचा रहिवासी पुरावा
 • 7/12 आणि 8 अ/ भाड्याची पावती

Age, Nationality and Domicile Certificate required Documents

वयाचा पुरावा | Proof of Age ( 18 वर्षांखालील लोकांसाठी कोणताही एक )

 • SFC प्रमाणपत्र
 • बोनाफाईड प्रमाणपत्र
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र
 • प्राथमिक शाळेतील प्रवेशातून उतारा

Age, Nationality and Domicile Certificate required Documents 3

रहिवासी पुरावा | Proof of Residence (कोणताही -1)

 • तलाठ्याकडून रहिवासी पुरावा
 • ग्रामसेवकाकडून रहिवासी पुरावा
 • बिल कलेक्टरकडून रहिवासी पुरावा

अनिवार्य कागदपत्रे | Mandotory Documents ( सर्व अनिवार्य )

 • स्वयं घोषणा पत्र

Age, Nationality and Domicile Certificate required Documents

वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारा कालावधी : 15 दिवस

निष्कर्ष :

वरील सर्व कागतपत्रे सादर करून तुम्ही 15 दिवसांमध्ये वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र ( Age, Nationality and Domicile Certificate ) काढू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *