साताऱ्यात आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते ६५ व्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे उदघाटन

0
basketball spardha
basketball spardha

सातारा- भारताचे भविष्य असलेली युवा पिढी सर्वगुणसंपन्न व्हावी. पुस्तकी ज्ञानाबरोबरच युवा पिढी विविध क्रीडा प्रकारात पारंगत असावी. खेळामुळे जीवन आंनदी होते आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती प्राप्त होत असते. ज्ञानाच्या आणि खेळाच्या जोरावर युवकांनी स्वतःचे आणि देशाचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

बास्केटबॉलची पंढरी असलेल्या सातारा शहरात कला व वाणिज्य महाविद्यालयाने नव्याने विकसीत केलेल्या सिंथेटिक बास्केटबॉल मैदानावर क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व के.एस.डी. शानभाग विद्यालय,सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षाखालील मुलींच्या ६५ व्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे अनौपचारिक उदघाटन तसेच कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सिथेंटक बास्केटबॉल मैदानाचे उदघाटन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक शरदराव चव्हाण होते. यावेळी मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक जयेंद्र चव्हाण, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे निरीक्षक अखिलेश सिंग, क्रीडाधिकारी श्री. कोळी, क्रीडा मार्गदर्शक श्री. सातव, तालुका क्रीडाधिकारी अभय चव्हाण, आंतरराष्ट्रीय पंच शरद बनसोडे, प्रा. जे.के.गुजर, प्रा. गौरव जाधव, सातारा जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष रोहन गुजर, सौरभ गवळी, सौरभ शर्मा आदी उपस्थित होते.

शैक्षणिक क्षेत्राबरोबरच कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा शहर व तालुक्‍यांत क्रीडा संस्कृती रुजवत आहे. बॅडमिंटन कोर्ट, अद्यावयत जिम, शुटींग रेंज यानंतर सिथेंटिक बास्केटबॉल मैदानाची उभारणी करुन कला व वाणिज्य महाविद्यालयाने साताऱ्याच्या क्रीडा क्षेत्रात मोलाची भर टाकली आहे. केवळ मैदान बांधून न थांबता महाविद्यालयाने तातडीने राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेसाठी त्याची उपल्बधता केल्याने नवोदित खेळाडूंना दर्जेदार खेळ पाहण्याची संधीही उपल्बध करुन दिली आहे. साताऱ्याला दर्जेदार बास्केटबॉल खेळची परंपरा आहे. या शहरातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडले आहेत. कला व वाणिज्य महाविद्यालयाने त्यांच्या प्रांगणात सिथेंटिक बास्केटबॉल मैदान उभारुन नवोदित खेळाडूंना सरावासाठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. आगामी काळात या महाविद्यालयातील खेळाडू देखील राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत चमकतील असा विश्‍वास आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केला. क्रीडा संघटक सिद्धार्थ लाटकर यांनी प्रास्ताविक केले. मोहन पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, क्रीडाप्रेमी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here