(Buying Property Checklist) घर-फ्लॅट व जमिन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी?

घर अथवा जमीन खरेदी कोणती काळजी घावी हे सविस्तर सांगितले आहे.

0
buying property checklist in marathi
buying property checklist in marathi

Buying Property Checklist in Marathi – आज मध्यमवर्गीय आणि सामान्य माणसाला जागा घेऊन घर बांधणे खूपच त्रासदायक झालेले आहे. स्वत:चे हक्काचे घर असणे हे कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. कारण ती त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक असते.

घर-फ्लॅट व जमिन ही संपूर्ण कुटुंबाची व येणाऱ्या पिढीची एक स्थावर मालमत्ता असते. मध्यमवर्गीय आणि सामान्य माणूस पुर्ण आयुष्य पै-पै पैसे जमवून घर, प्लॉट, फ्लॅट किंवा शेतजमीन खरेदी करतो.

आयुष्यभराची कमाई त्यात खर्च होते आणि काही कर्ज काढून सुद्धा खरेदी करतात. पण अनेकदा ही मालमत्ता खरेदी करताना विविध प्रकारे फसवणूक सुद्धा केली जाते.

कधी विक्री करणारा (Agent), तर कधी बिल्डर, तर कधी जमिन मालक फसवतो. तर काही वेळेस आपल्याला कागदपत्रे काय असतात, कागदपत्रे काय काय लागतात आणि कागदपत्रात काय काय चेक करायचे हेच माहित नसते त्यामुळे सुद्धा आपण फसल शकतो.

घर-फ्लॅट व जमिन खरेदी करताना आर्थिक किंवा भावनिक गुंतवणूक असल्यामुळे, आपण योग्य ती मालमत्ता योग्य त्या प्रक्रियेद्वारे विकत घेणे आणि त्यातील कायदेशीर बाबींचा घोळ टाळणे हे खुप महत्त्वाचे असते. त्या साठीच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की घर-फ्लॅट व जमिन खरेदी करताना काय काय काळजी घ्यायला हवी.

संबंधित व्यक्तींची ओळख आणि अधिकार सिद्ध करणे:

मालमत्तेचा व्यवहार हा सक्षम व्यक्तींमध्ये व्हायला हवा, ज्यांना त्याविषयीचे करारपत्र करण्याचा (स्वामित्व हक्क, मुखत्यारपत्र, इत्यादीद्वारे) अधिकार आहे. ओळखपत्र आणि केवायसी पुरावे हे मालमत्तेचा ग्राहक आणि विक्रेता यांची ओळख सिद्ध करण्यासाठी मदत करतात.

परंतु जमीन विषयक कायद्यांची माहिती नसल्यामुळे फसवणूकीस आणि मनस्तापास सामोरे जावे लागते. मात्र त्यासाठी अगोदरच सतर्क राहून माहिती काढल्यास आणि कायदेशीर बाबी माहीत करून घेतल्यास हे सर्व टाळता येवू शकते.

(Buying Property Checklist) कोणती कागदपत्र असावी:

1. सर्वप्रथम ती जमिन जिल्हाधिकाऱ्याची कृषिक (Agriculture) किंवा अकृषिक (Non Agriculture) आहे का हे तपासुन घ्यावे.

सामान्यतः घरासाठी जमिन घेत असाल तर जिल्हाधिकाऱ्याची अकृषिक (Non Agriculture/ N.A. permission) परवानगी अपने आवश्यक आहे.

महाराष्ट्र महसूल कायदा संहिता 1966 कलम 44 नुसार जमिनी संदर्भातील अकृषिक (Non Agriculture) परवानगी ही योग्य त्या पुर्ततेनुसार दिली जाते. कुठलीही जागा ही अकृषिक परवानगी घेतल्याशिवाय इतर कुठल्याही कामासाठी वापरली जावू शकत नाही.

2. जमिनीचा 7/12 किंवा सिटी सर्व्हेचा चालु उतारा काढून त्यावर मालकांचे नावे तपसावीत.

3. जमीन ग्रामपंचायत च्या अंतगत गावठाणात असल्यास ग्रामसेवकाकडुन मिळालेला फार्म 8 उतारा.

4. जमिनीत हिस्सा मागतील असे हिस्सेदार आहेत का? ते तपासावे म्हणजे त्या मालकाचे त्या उतारयात भाऊ बहिणीचे नाव आहे का? ते तपासावे.

5. सदर जमीन विक्री करणार आहे त्याच्या नावावर ती जमिन कशी झाली आहे यासाठी किमान 30 वर्षांपासूनच्या सर्व फेरफार नोंदी तपासाव्यात.

6. जमीन नावावर असलेले क्षेत्र व प्रत्येक्ष ताब्यात असलेले क्षेत्र यात फरक आहे का? हे ही तपासावे.

7. सातबारा उतारावर असलेली किंवा तोंडी सांगण्यात आलेली विहीर,झाडे, जमिनीचे क्षेत्र इ.बाबत प्रत्यक्ष बघुन  खात्री करून घ्यावी.

8. प्लँट घेत असताना नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडून मंजूर करून घेतलेले इमारतीचे आराखडे (Building Plan). यामध्ये संपूर्ण इमारतींचा आणि प्रत्येक स्वतंत्र मजल्याच्या (Building, Floor Plans and Lay outs ) आराखड्याचा समावेश होतो.

9. सदर इमारत ही टाऊनशिप प्लानिंग अंतर्गत येत असल्याचा अधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र व आराखडे.

10. दिलेल्या किंवा नमुद केलेल्या आराखड्यानुसार इमारतींचे बांधकाम सुरु करण्यासंदर्भातील महापालिकेचे “Commencement Certificate”. अथवा बांधकाम सुरु करण्याचा दाखला.

11. इमारतीची पाया उभारणी झाल्यानंतरचा “जोते तपासणी दाखला” बघावा.

12. इमारत पुर्ण होत चालल्यानंतर ती राहण्यायोग्य असल्याचे “Occupation Certificate” घ्यावे.

13. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र (Completion Certificate) घ्यावे.

14. एकूण प्लॉट, घर किंवा फ्लॅटपैकी किमान ६० टक्के मालमत्तेची विक्री झाल्यास सर्व सभासदांची बैठक घेऊन त्या
त्याची सोसायटी, कंपनी किंवा अपार्टमेंट असोसिएशन या तीनपैकी ज्या मध्ये मोफत असेल, त्याची नोंदणी करावी. यासाठी बिल्डरचे सहकार्य घ्याणे गरजेचे आहे.

15. सभासदांकडून घेतलेले वनटाइम मेंटेनन्स चार्ज किंवा कारपेस फंड सोसायटीच्या नावाने बँकेत जमा केल्याची खात्री करावी.

खरेदीखताची नोंदणी करणे:

शेवटी खरेदीखताची नोंदणी उपनिबंधक कार्यालयात मुद्रांक शुल्क (हे सक्षम शासकीय अधिकाऱ्यांद्वारे निश्चित केले जाते आणि प्रत्येक राज्यानुसार बदलते) भरने आवश्यक आहे.

नोंदणी न केलेल्या खरेदीखताच्या तुलनेत, न्यायालयात नोंदणी केलेले खरेदीखतच ग्राह्य धरले जाते. तसेच, खरेदीखताची नोंदणी केल्यानंतर त्याची नोंद जमिन/प्लांट घेतली आहे त्या प्रमाणपत्रावर होते.

buying property checklist tips in marathi
buying property checklist tips in marathi

घर खरेदी करताना ग्राहकाने वर नमूद केलेले मुद्दे आणि खरेदीखतातील कलमे लक्षात घेतली पाहिजेत. रारापत्रे खूप मोठी असतात, पण वाचन करणे हे आपल्या फायद्यासाठी व महत्त्वाचे असते. त्यामुळे ते पूर्ण समजायला मदत होते आणि भविष्यात मोठी समस्या उद्भवत नाही.

जमिनी किंवा प्लांट विषयक वकिलाची सेवा घेऊन खरेदीखताचा मसुदा बनवणे, त्यातील कलमे तपासणे, ती ग्राहकाच्या हिताची असतात या सर्वांची खात्री करणे, हे ह्या व्यवहारात महत्त्वाचे व फायद्याचे ठरते. जर तुम्हाला हे आरटीकल (Article) आवडले असले तर कमेंट द्वारे जरूर कळवा. 

अश्याच चांगल्या माहितीसाठी आणि मराठी लेखांसाठी महान्यूज संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here