Current Affairs 01 September 2019 (चालू घडामोडी)

0
Current Affairs 01 September 2019
mahanews.co.in

Current Affairs 01 September 2019 | www.mahanews.co.in

मुंबई : ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक मुंबईतील वरळी मतदारसंघातून लढणार आहेत.

नवि दिल्ली : वाहन वाहतूक रहदारीचे नियमांचे उल्लंघन करणार्‍यांनी सावध रहा! 1 सप्टेंबरपासून मोठ्या दंडांची तरतुद केली आहे. तसेच यात कमीत कमी म्हणजे 500 रुपये दंड हा रस्ते नियम तोडण्यासाठी असून जास्तीत जास्त म्हणजे 25 हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास हा अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला भोगावा लागणार आहे.

महाराष्ट्रः माजी राज्यमंत्री नारायण राणे 1 सप्टेंबरला भाजपमध्ये सामील होणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक मोठा नेता भारतीय जनता पक्षात सामील होणार आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे दिग्गज नेते यांनी गुरुवारी स्वत: ही घोषणा केली. कॉंग्रेस सोडल्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने राणे राज्यसभेवर निवडून गेले. नंतर त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पार्टी स्थापन केली जो सध्या एनडीएचा भाग आहे.

मुंबई : पुण्यातील कॉसमॉस बॅंकेचा डेटा चोरुन 95 कोटी लाखांची फसवणूक करणाऱ्या तिघांना ठाणे पोलिसांनी गजाआड केले आहे. एटीएम कार्ड क्लोन करुन पैसे काढणाऱ्या टोळीच्या चौकशीत ही माहिती पुढे आल्याचे पोलीसांनी सांगितले.

मुंबई : राज्यातील पूरस्थितीमुळे आलेल्या, शाळांची उभारणी, दुरुस्ती करण्यासाठी तसेच इतर महत्त्वाचे शैक्षणिक प्रकल्प राबवण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री आणि बालभारती नियामक मंडळाची शुक्रवारी मुंबईत बैठक पार पडली. यावेळी काही महत्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले. यामध्ये पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली आहे.

मुंबई : राज्यातील पूरस्थितीमुळे मोडकळीस आलेल्या, पडलेल्या शाळांची उभारणी, दुरुस्ती करण्यासाठी तसेच इतर महत्त्वाचे शैक्षणिक प्रकल्प राबवण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री आणि बालभारती नियामक मंडळाची शुक्रवारी मुंबईत बैठक पार पडली. बैठकीमध्ये पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली आहे.

मुंबई : औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

बीड: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले की कर्जत जामखेडचे आमदार राम शिंदे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात येईल आणि विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यास त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल.

दररोज चालू घडामोडी वाचण्यासाठी महान्यूज संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here