Current Affairs 02 September 2019 (चालू घडामोडी)

0
Current Affairs 02 September 2019
mahanews.co.in

Current Affairs 02 September 2019 | www.mahanews.co.in

महाराष्ट्र : आले रे घरी गणपती बप्पा आले, अवघ्या महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण, महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायचं आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी आगमन झालं. गणपती बाप्पा मोरया आणि ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या गणरायांचे स्वागत केले. श्रींची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या निमित्तानं अवघा महाराष्ट्र भक्तिरसात चिंब झाला असून पुढील दहा दिवस हा जल्लोष पाहायला मिळणार आहे.

गणेश उत्सवाची सुरूवात : देशाला एका धाग्यात बांधण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सर्व प्रथम  सार्वजनिक गणपती ट्रस्ट सदाशिव पेठ, विंचुरकर वाडा, पुणे येथे  1894 ला स्थापना करण्यात आली.

मुंबई  : मुंबई की सबसे प्रसिद्ध गणपति प्रतिमा ‘लालबाग के राजा’ को अंतरिक्ष मिशन चंद्रयान-2 की थीम पर स्थापित किया गया है। प्रतिमा के दोनों ओर दो कृत्रिम अंतरिक्ष यात्री बनाए गए हैं।

हैद्राबाद : हैद्राबादच्या खैरताबाद येथे एक कोटीच्या खर्चासह 61 फूट उंच गणेशमूर्तीची स्थापना केली आहे.

कोल्हापूर : ढोलताशांचा निनाद, झांजपथकाचा ठेका, ‘गणपती बप्पा मोरया’ चा अखंड गजर आणि पावसाच्या हलक्या सरी झेलत सोमवारी विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचे जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आले. पारंपरिक वाद्यांसह साउंड सिस्टिमवर थिरकणाऱ्या तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात गणरायाची प्रतिष्ठापना केली.

ऋिहरिकोटा : चांद्रभूमीवर उतरवण्यात येणाऱ्या विक्रम लॉन्डर आणि प्रग्यान रोव्हरला मुख्य ‘चंन्द्रयान- 2‘ पासून अलग करण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेला सोमवारी यश आले. सोमवारी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी विक्रम लँडर ‘चांद्रयान-२’ पासून अलग झाल्याचा संदेश इस्रोला प्राप्त झाला.

मनमाड : मनमाड रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमध्ये श्री गणेश मूर्तीची वाजत गाजत प्रतिष्ठापना करण्यात आली. मनमाड रेल्वे स्थानकात ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष झाला.

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने धडाकेबाज कामगिरी करत विराट कोहलीला मागे टाकलले आहे. आयसीसी क्रमवारीत ९०४ गुणांसह ऑस्ट्रेलियाचा स्मिथ पहिल्या स्थानावर आहे. तर ९०३ गुणांसह विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आयसीसी कसोटी क्रमवारीत करिअरच्या सर्वोत्तम स्थानावर झेप मारली आहे.

मुंबई : भाजपात प्रवेशाबाबत मुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपात माझा पक्ष विलिन करणार असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

धुळे : शिरपूरजवळ रुमित रसायन बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

मुंबई : ग्रामपंचायत आणि राज्य शासनातील महत्त्वाचा दुवा असलेले ग्रामसेवक मागील सात दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. राज्यात 21 हजार ग्रामसेवक कार्यरत असून हे सर्व ग्रामसेवक संपावर गेल्यानं राज्यातील ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाला आहे. राज्यातील 27 हजार ग्रामपंचायतींच्या कामावर या संपाचा परिणाम झाला आहे.

दररोज चालू घडामोडी वाचण्यासाठी महान्यूज संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here