Current Affairs 04 September 2019 (चालू घडामोडी)

0
Current Affairs 04 September 2019
mahanews.co.in

Current Affairs 04 September 2019 | www.mahanews.co.in

नवी दिल्ली : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी-एअर ट्रॅफिक कंट्रोल) टॉवरचे उद्घाटन केले.

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी दिल्ली येथे नवीन हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) टॉवरचे उद्घाटन केले.

हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी-एअर ट्रॅफिक कंट्रोल) टॉवर :

एटीसी टॉवरची किंमत 350 कोटी रुपये आहे. टॉवरमध्ये तीन इमारती आहेत एरोड्रोम कंट्रोल टॉवर, क्षेत्र संपर्क नियंत्रण सेवा इमारत आणि प्रशासकीय ब्लॉक. टॉवरला आधुनिक एअर नेव्हिगेशन सिस्टम आणि प्रगत ऑटोमेशन सिस्टमची सुविधा आहे. हे सुरक्षितता आणि हवाई रहदारी ऑपरेशन्सची क्षमता वाढवेल.

एटीसी टॉवरची उंची 102 मीटर आहे. टॉवरचे उद्दीष्ट आहे की नियंत्रकांवर दबाव कमी करा आणि विलंबपासून उड्डाण करणार्‍यांना दिलासा द्या. टॉवरमध्ये चांगली कार्यक्षम क्षेत्राची दृश्यमानता असलेल्या 45 हून अधिक कार्य केंद्र आहेत. टॉवरने बहुस्तरीय सुरक्षा दिली आहे.

रायगड :  रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत आणि नागोठणे-रोहा दरम्यान दरड कोसळली त्यामुळे मुम्बई-कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

अलिबाग : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा दिसून येत आहे. पावसामुळे जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अंबा, सावित्री नद्यांनी बुधवारी सकाळी धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे नागोठणे आण महाड परिसरातील सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली.

मुंबई : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला असून समुद्र किनारी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, गरज असेल तरच घराबाहेर पडा, समुद्र किनारी ठिकाणी जाणे टाळा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. तर दुसरीकडे पनवेलमध्ये विक्रमी पावसाची नोंद केली आहे. पनवेलमध्ये गेल्या 24 तासांत 220 मिमी पाऊस पडला आहे. या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. कुर्ला आणि सायन येथे रुळावर पाणी साचू लागले आहे.

मुंबई: देशातील सध्याच्या आर्थिक मंदीबद्दल कोणिही काहीही बोलत असले तरी अर्थव्यवस्थेला बूच लागले आहे. असे मनमोहन सिंह या शहाण्या माणसानं सौम्य शब्दांत हेच सांगितलंय. मंदीचं राजकारण न करता त्यांचा सल्ला गांभीर्यानं घ्या. त्यातच राष्ट्राचं हित आहे,’ अशा परखड शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मोदी सरकारला सुनावलं आहे.

नवी दिल्लीः  आयडीबीआय बँकेला ९,३०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय केंद्र सरकारतर्फे बुधवारी घोषित करण्यात आले. या बँकेचा भांडवली पाया बळकट करणे व पर्यायाने तिला नफ्यात आणणे या उद्देशाने हा निधी देण्यात येणार आहे. यातील 4600 कोटी रुपये केंद्रातर्फे तर 4700 कोटी रुपये एलआयसीतर्फे (भारतीय आयुर्विमा महामंडळ) दिले जातील.

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बॅडमिंटनपटू रोहन गुरबानी याची भारतीय संघात निवड झाली आहे. रशियातील कझान येथे  बीडब्लूएफ वर्ल्ड ज्युनिअर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धो होणार आहे. या १९ वर्षांखालील जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात रोहनची निवड झाली आहे.

कोलंबो : श्रीलंकेतील यूनिसेफच्या एका परिषदेमध्ये पाकिस्ताननं काश्मीर मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करताच भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळानं त्यांना जोरदार प्रत्यूत्तर दिलं. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई आणि भाजपाच्या संजय जैसवाल यांनी पाकिस्तानी शिष्टमंडळाचे दावे पूर्णपणे खोडून काढले. खासदार गौरव गोगोई यांनी केवळ प्रत्यूत्तर दिलं नाही तर पाकिस्तानमधील कायदा आणि अल्पसंख्यांवरील अत्याचाराबाबतही त्यांना खडे बोल सुनावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 सप्टेंबरपासून तीन दिवसांच्या रशिया दौर्‍यास प्रारंभ केला आहे. पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमवेत रशियन झवेझदा जहाज बांधणी संकुलाला भेट दिली. रशियन सुदूर पूर्व विभागाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. भारत-रशिया भेटीचे महत्त्व: सहकार्याच्या संभाव्य परिणामाचा शोध घेताच जहाज बांधणी विभागात रशियाच्या उत्कृष्ट क्षमता शोधण्याची भेट.

दररोज चालू घडामोडी वाचण्यासाठी महान्यूज संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here