Current Affairs 31 August 2019 (चालू घडामोडी)

0
Current Affairs 31 August 2019
mahanews.co.in

Current Affairs 31 August 2019 | www.mahanews.co.in

महाराष्ट्र : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधुन घेतलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्या प्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने सुरेश जैन यांना सात वर्ष तर गुलाबराव देवकरांना पाच वर्षाचा कारावास आणि 90 कोटींचा दंड आकारला आहे.

महाराष्ट्र : शिवसेना नेते संजय राऊत यांनी, आदित्य ठाकरेना  विधानसभा निवडणूक लढावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. आणि नवीन पिढी राजकारणात यायला हवी असं मत ही व्यक्त केले आहे,

सांगली : पुरग्रस्तांच्या मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी यांच्या कार्यालवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चा काढला , मोर्चामध्ये राजू शेट्टी, विश्वजित कदम, विशाल पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

धुळे : शिरपूर तालुक्यातील वाघाडीजवळील केमिकल फॅक्टरीत स्फोट, दहा जणांचा मृत्यू, आणि काहीजन गंभीर जखमी आहेत, घटनास्थळी अग्निशमनच्या गाड्या दाखल झाल्या आहेत आणि बचाव कार्य चालु आहे.

आयटीआर : इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची आज दिनांक 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे , सोशल मीडियावरील वाढीव तारखेचा दावा केवळ अफवा असुन त्यावर कोणीही विश्वास ठेवु नये असे आयकर विभागाची माहिती.. .

आसाम: आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची (एनआरसी) अंतिम यादी 31 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 10 वाजता जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 19 लाख लोकांना आपले स्थान मिळवता आले नाही.

एनआरसीचे राज्य समन्वयक प्रितीक हजारिका यांच्या म्हणण्यानुसार, एकूण 3,11,20,550 लोकांना या यादीत स्थान देण्यात यश आले आहे. ते म्हणाले की एनआरसीच्या अंतिम यादीतून 19,05,978 लोकांना काढून टाकण्यात आले आहे.

सातारा : पावसाचा जोर वाढल्यामुळे कोयणा धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता, कोयणा आणि कृष्णा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा.

गुगलने पंजाबी लेखिका अमृता प्रीतम यांच्या सन्मानार्थ डूडल बनवला आहे. अमृता ही तिच्या काळातील प्रसिद्ध लेखकांपैकी एक होती. 31 ऑगस्ट 2019 ला अमृताची 100 वी जयंती आहे.

अमृताला तारुण्यापासूनच कथा, कविता आणि लेखन आणि निबंधाची आवड होती. तिचे पहिले काव्यसंग्रह ती 17 वर्षांची असताना प्रकाशित झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीके सिन्हा (निवृत्त आयएएस अधिकारी) यांना पीएमओमध्ये विशेष अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. ते उत्तर प्रदेश केडेट चे 1977 च्या आयएएस अधिकारी बॅचमध्ये सिलेक्शन  झाले होते.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने वनीकरण प्रकल्पांसाठी 47,000 कोटी रुपयांचा कॅम्पा निधी विविध राज्यांना जाहीर केला आहे.

दररोज चालू घडामोडी वाचण्यासाठी महान्यूज संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here