Cyber Crime : दाऊद गॅंगकडून डॉक्टर महिलेला खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी

0
Cyber Crime
Cyber Crime

Cyber Crime : व्यवसायाने डॉकटर असलेल्या एका महिलेला ८० हजाराची खंडणी मागण्याचा प्रकार घडला आहे. मोबाईलवर अज्ञाताने मेसेज करून ८० हजार रुपये न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच मेसेजमध्ये दाऊद गॅंगचा उल्लेख केल्याने संबंधित महिलेला धक्का बसला आहे.

या मेसेजबद्दलची माहिती या महिलेने कुटुंबियांना दिल्यानंतर ते घाबरून गेले. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ पोलीस मुख्यालयातील सायबर सेलला या घटनेची माहिती दिली. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून सायबर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस या घटनेसंदर्भात अधिक तपास करीत आहेत. यापूर्वीदेखील अनेकांना या प्रकारचे मेसेज आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे संशयित गुन्हेगार खरोखरच दाऊद गॅंगमधील गुन्हेगार आहे की सायबर गुन्हेगार आहे याबाबत तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच अशा प्रकारचे मेसेज आल्यास घाबरून न जात पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here