धुळ्यात विजेच्या धक्क्याने चार वर्षांच्या बालकाचा मृत्यू

1
dhule accident lavyam relan

चार वर्षांचा बालक खेळता खेळता विजेच्या खांबाजवळ गेला आणि विजेच्या धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. धुळे शहरात काल रात्री ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले.

धुळे शहरातील साक्री रोडवरील कुमारनगर येथे लव्यम प्रशांत रेलन (वय ४) हा बालक गल्लीतील रस्त्यावर खेळत होता. खेळता खेळता तो विजेच्या खांबाजवळ गेला. या खांबात वीजप्रवाह सुरु होता. लव्यमचा हात चुकून त्या खांबाला लागला. तत्क्षणी तो दूर फेकला गेला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. शहरातील उद्योजक महेंद्र रेलन यांचा लव्यम हा पुतण्या होता.

अगदी काही सेकंदामध्ये ही घटना घडली. उपस्थित लोकांना या घटनेचा जबर धक्का बसला. या दुर्घटनेची माहिती मिळताच अनेक रहिवाश्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here