Dinvishesh 05 November – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
dinvishesh 05 november
dinvishesh 05 november

Dinvishesh 05 November 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (Dinvishesh 05 November):

1817: इंग्रज व दुसरे बाजीराव यांच्यात खडकी येथे लढाई.

1824: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.

1872: महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसान अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला 100 डॉलर दंड करण्यात आला.

1945: कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

1951: बी. बी. सी. आय. (Bombay Baroda and Central India) रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वे यांचे विलिणीकरण करुन ’पश्चिम रेल्वे’ची स्थापना करण्यात आली.

जन्मदिन:

1870: देशबंधू चित्तरंजन दास – बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी, साहित्यिक व वृत्तपत्रकार, विधवा विवाह व आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार व प्रसार केला. त्यांच्या स्मरणार्थ ’चित्तरंजन’ हे शहर वसवण्यात आले. (मृत्यू: 16 जून 1925).

1885: विल डुरांट – अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ (मृत्यू: 7 नोव्हेंबर 1981).

1908: प्रा. राजा राव – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (1964), त्यांना ’न्यूस्टाड्ट’ या साहित्यातील आंतरराष्ट्रीय पारितोषिकाने गौरवण्यात आले होते (1988). (मृत्यू: 8 जुलै 2006 – ऑस्टिन, न्यू जर्सी, यु. एस. ए.).

1913: विवियन ली – ब्रिटिश अभिनेत्री (मृत्यू: 8 जुलै )

1917: बनारसी दास गुप्ता – स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री (मृत्यू: 29 ऑगस्ट 2007).

1929: प्रा. योगेश्वर अभ्यंकर – गीतकार व सर्जनशील कवी (मृत्यू: 14 नोव्हेंबर 2000).

1930: अर्जुन सिंग – केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, 3 वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (मृत्यू: 4 मार्च 2011).

1955: करण थापर – पत्रकार.

स्मृतिदिन:

1879: जेम्स क्लार्क मॅक्सवेल – प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ (जन्म: 13 जून 1831 – एडिंबर्ग, यु. के.).

1915: सर फिरोजशहा मेहता – कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक (जन्म: 4 ऑगस्ट 1845).

1950: फैयाज खाँ – हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील प्रतिभाशाली गायक (आग्रा घराणे), त्यांनी ’प्रेमपिया’ या टोपणनावाने अनेक चिजा बांधल्या. (जन्म: 1880).

1991: शकुंतला विष्णू गोगटे – कथालेखिका व कादंबरीकार. त्यांच्या ’किती रंगला खेळ’, ’चंदनाची उटी’, ’कशाला उद्याची बात’ इ. पन्नास कादंबर्‍या आणि ’झपूर्झा’, ’सावलीचा चटका’, ’मर्यादा’ इ. तीस कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. (जन्म: 1930).

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here