Dinvishesh 06 November – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
dinvishesh 06 november
dinvishesh 06 november

Dinvishesh 06 November 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (Dinvishesh 06 November):

1860: अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे 16 राष्ट्राअध्यक्ष म्हणून निवडून आले.

1913: दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.

1954: मुंबई राज्यात विजय मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.

1996: ’अर्जेंटिनाचे गांधी’ म्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते ’जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

1999: विकसनशील देशांना जैवतंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करुन दिल्याबद्दल भारताचे वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना ’युनेस्को गांधी सुवर्णपदक’ जाहीर केले.

2001: संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO) महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना प्रतिष्ठेचा ‘वाय. नायडुम्मा स्मृती पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला. युद्धनौकेवरुन युद्धनौकेवर मारा करणारे ’धनुष’ हे संपूर्ण भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र विकसित करण्यात डॉ. अत्रे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

2012: बराक ओबामा आणि जो बिडेन यांची दुसर्‍यांदा अनुक्रमे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.

जन्मदिन:

1814: अ‍ॅडोल्फ सॅक्स हे सॅक्सोफोन या वाद्याचे जनक (मृत्यू: 4 फेब्रुवारी 1894).

1839: भगवादास इंद्रजी हे प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ .

1861: बास्केटबॉल खेळाचे निर्माते जेम्स नास्मिथ. (मृत्यू: 28 नोव्हेंबर 1939).

1880: बळवंत गणेश खापर्डे  (कविभूषण, दादासाहेब खापर्डे यांचे सुपुत्र) .

1901: श्रीकृष्ण के. क्षीरसागर हे लेखक, विचारवंत, समीक्षक (मृत्यू: 28 एप्रिल 1989).

1915: दिनकर द. पाटील हे चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (मृत्यू: 21 मार्च 2005).

1926: झिग झॅगलर – अमेरिकन लेखक (मृत्यू: 28 नोव्हेंबर 2012).

स्मृतिदिन:

1761: औरंगजेबाच्या बलाढ्य फौजेशी टक्‍कर देताना मराठेशाही वाचवणार्‍या महाराणी ताराबाई (मराठा साम्राज्यातील 4 थी छत्रपती) यांचे निधन (जन्म: 1675).

1998: अनंतराव कुलकर्णी हे साहित्याची उत्तम जाण असलेले प्रकाशक, ’कॉन्टिनेन्टल प्रकाशन’ चे संस्थापक (जन्म: 19 सप्टेंबर 1917).

1992: ’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार
यांचे पुणे येथे निधन. (जन्म: 6 डिसेंबर 1916).

1987: प्रा. भालचंद्र वामन तथा ’भालबा’ केळकर – लेखक व अभिनेते (जन्म: 23 सप्टेंबर 1920).

1985: हरी जरीवाला ऊर्फ ’संजीव कुमार’ – रुपेरी चित्रसृष्टी निखळ अभिनयाच्या जोरावर गाजवणारे कसदार अभिनेते (जन्म: 9 जुलै 1938).

1836: चार्ल्स (दहावा) हा फ्रान्सचा राजा यांचे निधन, (जन्म: 9 आक्टोबर 1757).

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here