Dinvishesh 08 November – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
dinvishesh 08 november
dinvishesh 08 november

Dinvishesh 08 November 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (Dinvishesh 08 November):

1895: दुसराच एक प्रयोग करत असताना विल्हेम राँटजेन यांना क्ष किरणांचा शोध लागला.

1889: मोंटाना हे अमेरिकेचे 41 वे राज्य बनले.

1939: म्युनिक येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर प्राणघातक हल्ल्यातुन बचावला.

1947: पंजाब अँड हरयाणा उच्‍च न्यायालयाची स्थापना .

1960: अटीतटीच्या लढतीत रिचर्ड निक्सन यांचा पराभव करुन जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष बनले.

1987: पुणे मॅरेथॉनचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते उद्घाटन. पुणे मॅरेथॉन ही स्पर्धा सुरेश कलमाडी यांनी सुरू केली.

1996: कवी व लेखक प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ’ग्रेस’ यांची विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड.

2002: जी. बी. पटनायक यांनी भारताचे 32 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

2016: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

2016: सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 व 1000 च्या नोटा रद्द केल्या.

जन्मदिन:

1656: हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचा जन्म.(मृत्यू: 14 जानेवारी 1742).

1893: थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा)  यांचा जन्म. (मृत्यू: 30 मे 1941).

1909: स्वातंत्र्यसैनिक, निर्भिड पत्रकार व काँग्रेसचे तत्त्वनिष्ठ नेते नरहर वामन तथा ’नरुभाऊ’ लिमये यांचा जन्म. (मृत्यू: 39 ऑगस्ट 1998)

1917: कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित, देशातील कर्करोग संशोधनाची सुरुवात करण्याचे श्रेय डॉ. व्ही. आर. खानोलकर व डॉ. कमल रणदिवे यांना दिले जाते. कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे यांचा जन्म.(मृत्यू: 11 एप्रिल 2000).

1919:  आपल्या अलौकिक प्रतिभेने जगभरातील मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे आणि त्यांची अभिरुची संपन्न करणारे लेखक, नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, वादक आणि वक्ते पु. ल. देशपांडे तथा ’पु. ल.’  यांचा जन्म. (मृत्यू: 12 जून 2000 – पुणे).

1920: भारतीय अभिनेत्री नृत्यांगना सितारादेवी यांचा जन्म. ( मृत्यू: 25 नोव्हेंबर 2014) .

1927:  भारताचे उपपंतप्रधान, केन्द्रीय माहिती व नभोवाणी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म.

1953: भारतीय राजकारणी नंद कुमार पटेल यांचा जन्म. ( मृत्यू: 25 मे 2013) .

1970: मायस्पेस चे सहसंस्थापक टाँम एएंडरसन यांचा जन्म.

1976: ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ब्रेट ली यांचा जन्म.

स्मृतिदिन:

1226: फ्रान्सचा राजा लुई (आठवा) यांचे निधन. (जन्म: 5 सप्टेंबर 1187).

1674:  कवी, विद्वान व मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचे निधन. (जन्म: 9 डिसेंबर 1608).

1960: भारतीय हवाई दल प्रमुख सुब्रतो मुखर्जी यांचे निधन.

2013: भारतीय पत्रकार आणि अभिनेता अमांची सुब्रमण्यम यांचे निधन. (जन्म : 2 जानेवारी 1957) .

2015: भारतीय एअर मार्शल ओमप्रकाश मेहरा यांचे निधन. (जन्म : 19 जानेवारी 1919).

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here