Dinvishesh 09 November – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
dinvishesh 09 november
dinvishesh 09 november

Dinvishesh 09 November 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (Dinvishesh 09 November):

1906 : आपल्या कार्यकालात देशाबाहेर जाणारे थिओडोर रुझव्हेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी पनामा कालव्याला भेट दिली.

1923 : दिनचर्या नावाचे पत्र दत्तात्रय गणेशजी यांनी सुरू केले.

1937 : जपानी सैन्याने चीनमधील शांघाय शहराचा ताबा घेतला.

1947 : भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.

1953 : कंबोडियाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

1960 : रॉबर्ट मॅकनामारा हे फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष बनले. ’फोर्ड’ आडनाव नसणारे ते पहिलेच अध्यक्ष होते. मात्र जॉन केनेडी यांच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यामुळे एक महिन्यातच त्यांनी राजीनामा दिला.

1965 : इलेक्ट्रिसिटी ग्रिड खराब झाल्याने न्यूयॉर्क शहरासह पूर्व अमेरिकेतील बर्‍याच भागाचा वीजपुरवठा 12 तास खंडित झाला.

1988 : मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलात दुर्घटना. भीषण आगीत 12 मृत्यूमुखी.

1997 : साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ चा जनस्थान पुरस्कार प्रदान.

2000 : उत्तराखंड उच्‍च न्यायालयाची स्थापना.

2000 : न्यूयॉर्क येथे झालेल्या एका लिलावात पाब्लो पिकासोचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे.

जन्मदिन:

1867 : जैन तत्वज्ञानी, विद्वान कवी श्रीमद रामचंद्र यांचा जन्म. (मृत्यू : 9 एप्रिल 1901).

1877 :  पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते सर मुहम्मद इक्‍बाल यांचा जन्म. (मृत्यू: 21 एप्रिल 1938).

1877 : इटली प्रजासत्ताकचे पहिले अध्यक्ष इराको डी निकोला यांचा जन्म. (मृत्यू : 1  ऑक्टोबर 1959).

1877 : सारे जहाँ से अच्छा चे पाकिस्तानी कवी, तत्वज्ञ व राजकीय नेते कवि मोहम्मद इकबाल यांचा जन्म. (मृत्यू : 21 एप्रिल 1938).

1904 : सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचा जन्म. (मृत्यू: 18 मे 1966).

1918: तायक्वोंडो मार्शल आर्ट चे निर्माते चोई हाँग हाय च्या निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 15 जुन 2002).

1924 : ख्यालगायक, गुरु व बंदिशकार पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास यांचा जन्म. (मृत्यू: 10 जानेवारी 2002).

1931 : लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत एल. एम. सिंघवी यांचा जन्म. (मृत्यू: 6 आक्टोबर 2007).

1934 : अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक कार्ल सगन यांचा जन्म. यांनी सुमारे 600 हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले. शुक्राच्या पृष्ठभागावरील उच्‍च तापानाचा शोध त्यांच्या प्रयत्‍नामुळे लागला. (मृत्यू: 20 डिसेंबर 1996 – सिअ‍ॅटल, वॉशिंग्टन, यु. एस. ए.).

1944 : भारतीय कोरिओग्राफर चितेश दास यांचा जन्म. (मृत्यू: 4  जानेवारी 2015).

1980 : अभिनेत्री व मॉडेल पायल रोहतगी यांचा जन्म.

स्मृतिदिन:

1940 : इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचे निधन.(जन्म: 18 मार्च 1869).

1952 : इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष चेम वाइझमॅन यांचे निधन. (जन्म: 27 नोव्हेंबर 1874).

1962 : स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक, पद्मभूषण, भारतरत्‍न महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे यांचे निधन. (जन्म: 18 एप्रिल 1858).

1966 : नटवर्य बाबूराव पेंढारकर यांचे निधन. (जन्म: 1897)

1970 : फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती चार्ल्स द गॉल यांचे निधन.  (जन्म: 22 नोव्हेंबर 1890).

1977 : गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक केशवराव भोळे यांचे निधन. ’अमृतमंथन’, ’संत तुकाराम’, ’ कुंकू’, ’माझा मुलगा’,’ संत ज्ञानेश्वर’, ’संत सखू’ आदी बोलपटांतील गीतांच्या स्वररचना आणि संगीत दिग्दर्शन त्यांनी केले होते. ’एकलव्य’ या टोपणनावाने त्यांनी ’वसुंधरा’ या साप्ताहिकात अभिजात गायक-गायिकांविषयीचे लेख लिहिले. क्रिकेटवरही ते अभ्यासपूर्ण लेखन करत असत. (जन्म: 23 मे 1896).

2000 : मिस वर्ल्ड स्पर्धेचे निर्माते एरिक मॉर्ले यांचे निधन. (जन्म: 26 सप्टेंबर 1918).

2003 : मैथिली भाषेतील लेखक व कवी विनोद बिहारी वर्मा यांचे निधन.

2005 : भारताचे 10 वे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन.  (जन्म: 27 आक्टोबर 1920)

2011 : जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हर गोविंद खुराना यांचे निधन. (जन्म: 9 जानेवारी 1922).

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here