फ्लॅटधारकांना इमारतीच्या जागेचे मालक होता येणार

0
imarticha saatbara, property card
mahanews.co.in

News | मुंबई, पुणे, नागपूर,नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापुर किंवा महाराष्ट्रामधील इतर शहरांमध्ये राहणाऱ्या फ्लॅटमालकांना दिलासा देणारी बातमी आहे.

आता फ्लॅटधारकांना इमारतीच्या जागेचे मालक होता येणार, इमारतीच्या सातबारावर नाव लागणार.

राज्य सरकारने इमारतीमधील फ्लॅट आणि जागेची नोंदणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे सर्व फ्लॅटमालकांना जमिनीचे मालक हेण्याचा फायदा होईल.

राज्यमंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत इमारतीमधील फ्लॅटमालकांना फक्त फ्लॅटमध्येच मालकी हक्क असायचा, मात्र ज्या इमारतीत राहतो, त्याच्या प्रॉपर्टी कार्डवर त्याचं नाव नसायचं, हे नाव बिल्डरचेअसायचे परंतु सरकारच्या या निर्णयानंतर आता त्याला फ्लॅटसोबतच इमारतीच्या जागेचा मालकी हक्क असल्याचा पुरावाही मिळणार आहे.

Building
© 3D Warehouse

राज्यभरातील सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त असलेल्या इमारतींमधील जवळपास पाच कोटी फ्लॅटमालकांना याचा फायदा मिळणार आहे.

याआधी फ्लॅटच्या खरेदीची नोंदणी केवळ रजिस्ट्रार कार्यालयात व्हायची. त्यामुळे इमारतीत कितीही लोक राहत असले तरी मूळ इमारतीच्या जागेच्या सातबारावर बिल्डरचे किंवा मूळ जागा मालकाचा हक्क असायचा. त्यामुळे सोसायटीची स्थापना झाल्यानंतर फ्लॅटमालकांना बिल्डरच्या मागे लागावे लागत.

सध्या या कायद्याचं नियम ठरले नाहीत, तरी नियम ठरविण्याचं काम सुरु आहे. त्याची नियमावली बनवल्यानंतर ती सूचना कायद्यात रुपांतरीत होइल.

अश्याच ताज्या बातम्यांसाठी महान्यूज संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here