(Indian Air Force Day) आज 8 ऑक्टोबर रोजी भारतीय वायु सेना दिवस आहे

08 October 2019, Indian Air Force Day information in Marathi

0
indian air force day information in marathi
Copyrights: Indian Air Force

Indian Air Force Day 2019 – Maharashtra News | MahaNews

8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली. दरवर्षी हा दिवस या भारतीय वायुसेना दिवस म्हणून साजरा केला जातो.

भारतीय वायु सेना जगातील चौथे सर्वात मोठे हवाई दल आहे. भारतीय हवाई दलाकडे एकूण 1,70,000 जवान आणि 1800 लढाऊ विमानांची संख्या आहे. अमेरिका, चीन आणि रशिया नंतर भारतातील सर्वात मोठे हवाई दल आहे.

हवाई दल भारतीय सैन्य दलांचा एक भाग आहे जो देशासाठी हवाई लढाई, हवाई सुरक्षा आणि हवाई देखरेखीची महत्त्वपूर्ण कामे करतो. स्वातंत्र्यापूर्वी हे रॉयल इंडियन एअरफोर्स म्हणून ओळखले जात असे परंतु नंतर रॉयल हा शब्द त्याच्या नावावरून वगळला गेला.

भारतीय वायुसेनेकडे देशाच्या कानाकोपरयात 60 हून अधिक एयरबेसेस आहेत.

भारतीय हवाई दलाचा प्रमुख इतिहास:

indian air force day 2019
Copyrights: Indian Air Force

भारतीय वायु सेना (इंडियन एयरफोर्स) हा भारतीय सशस्त्र दलांचा एक भाग आहे जो देशासाठी हवाई लढाई, हवाई सुरक्षा आणि हवाई देखरेखीची महत्त्वपूर्ण भूमिकेची कामे करत असते.

ब्रिटिश साम्राज्याने 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय हवाई दलाची अधिकृत स्थापना केली.  लष्कराला जमिनिवरूल लढाईत मदत करणार्‍या ब्रिटीश साम्राज्याच्या सहाय्यक दलाचे ही सेना होती.

1945 च्या दुसर्‍या महायुद्धाच्या काळात भारतीय वायु सेनेची महत्त्वपूर्ण भूमिका होती. म्हणून भारताच्या विमान सेवेला ‘रॉयल’ या नावाने गौरविण्यात आले. आणि ब्रिटिशांनी वायु सेनेला ‘रॉयल इंडियन एअरफोर्स’ हे नाव देण्यात आले.

  भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यातून ‘रॉयल’ हा शब्द काढून फक्त “भारतीय वायु सेना” हे ठेवले.

 1950 नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले एअर मार्शल सुब्रोता मुखर्जी बनले.

भारतीय हवाई दलाबद्दल माहिती:

1990 मध्ये प्रथमच महिलांना सशस्त्र बलामध्ये देखील समाविष्ट करण्यात आले, परंतु त्यांना शार्ट सर्विस कमीशन ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले. आणि त्यांची सर्विस केवळ 14 ते 15 वर्षे सेवेची परवानगी देण्यात आली. 1990 मध्ये महिला चॉपर और ट्रांसपोर्ट एयरक्राफ्टवर प्रथमच समाविष्ट करण्यात आले.

भारतीय वायुसेनामध्ये पाच कमांड आहेत. नवी दिल्लीमध्ये पश्चिम कमांड, इलाहाबादमध्ये सेन्ट्रल कमांड, शिलाँग मध्ये पूर्व कमांड, जोधपूरमध्ये दक्षिण पश्चिम कमांड, तिरुअनंतपुरम मध्ये दक्षिण कमांड आहे.

भारतातील राष्ट्रपती हे एअर फोर्सचे कमांडर असतात. इंडियन एअर फोर्सची दाइत्व त्यांचे मिशन बाजू सशस्त्र बला 1947 ला परिभाषित केली गेली आहे.

सर्व बाजूंनी संरक्षण करण्यापासुन भारताच्या वायु क्षेत्रातील रक्षण करणे, सशस्त्र सेनेच्या आणखी शाखांच्या बरोबर मेल मिलाप करूने आणि देशाची सुरक्षा करणे ही भारतीय वायुसेनांची प्राथमिक जबाबदारी आहे.

भारतीय वायुसेना भारतीय सैनिकांना युद्धभूमीवर देखील पाठिंबा देते, आणि तसेच धोरणात्मक आणि एयरलिफ्ट करवून मदत करते.

भारतीय वायु सेनेतील फायटर एयरक्राफ्ट:

राफेल (Rafel) : हे भारतीय वायु सेनेतील सर्वात जास्त मजबूत फायटर विमान. याची स्पीड 1930 किमी प्रति तास आहे. राफेल ची रशिया मध्ये टेस्टिंग चालु आहे. आणि हे विमान आज 8 ऑक्टोबर रोजी दसरा च्या मुहुर्तावर भारतीय वायु सेनेत शामिल  होणार आहे.

सुखोई एसयू- 30 (Sukhoi Su-30) : भारतीय सेनेजवळ जगातील सर्वात चांगले एयरक्राफ्ट आहे. सुखोई एसयू – ३० हे भारतीय हवाई दलाचे एक लढाऊ विमान आहे. सुखोई एसयू- ३० हे एक बहुउद्देशी, दोन आसनी व दोन इंजिने असणारे लढाऊ विमान आहे. याची रचना रशियाच्या सुखोई एव्हिएशन कॉर्पोरेशनने केलेली आहे.

हे विमान सर्व प्रकारच्या हवामानात काम करू शकते. या विमानाची, हवेतून-हवेत आणि हवेतून-जमिनीवर मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची व डागण्याची क्षमता आहे. पहिली उड्डाण  डिसेंबर 1988 ला झाली व 1996 मध्ये रशियाच्या हवाईदलात ते समाविष्ट करण्यात आले.

मिग-21 (Mig-21) : मिकोयान मिग-21 हे एक सुपरसॉनिक प्रकारातील एका इंजिनाचे, रशियन बनावटीचे लढाऊ विमान आहे. जगातील सुमारे ५० देशांमध्ये चार खंडात हे विमान वापरात आहे.

हे जगातले सर्वाधिक प्रमाणात निर्मिती झालेले विमान आहे. भारतात 1966 मध्ये नाशिक जवळ हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीच्या कारखान्यात या विमानांच्या उत्पादनास सुरुवात झाली आणि 600 विमानांची निर्मिती करण्यात आली.

एचएएल तेजस ( HAL Tejas): एचएएल तेजस हे हलक्या वजनाच्या लढाऊ विमानवर्गातील अर्थात लाइट काँबॅट एरक्राफ (एल.सी.ए.) वर्गातील संपूर्ण  स्वदेशी (भारतीय) बनावटीचे लढाऊ विमान आहे. 

1983 साली एल.सी.ए. हा कार्यक्रम भारतीय शासनातर्फे हाती घेण्यात आला.  1979 पासून भारतीय वायु सेना रशियन बनावटीच्या मिग 21 वापरत होती. तसेच विदेशी बनावटीच्या विमानांवरील वापप कमी व्हावे हासुद्धा विचार त्यामागे होता.

जॅग्वार: भारतीय हवाई दलाचे दोन इंजिने असलेले छोटे लढाऊ विमान आहे. ‘जग्वार’ हे कमी उंचीवरून उडत लक्ष्यांचा वेध घेणारे लढाऊ विमान आहे. भारतीय हवाईदलात सध्या जमीन आणि सागरी संरक्षणासाठी दोन प्रकारची ‘जग्वार’ विमाने वापरली जातात. हे वजनाने हलके, चपळ, तांत्रिकदृष्ट्या कमी गुंतागुंतीचे आहे.

भारतीय वायु सेनेत जग्वार ही महत्त्वाची विमाने आहेत. कारगिलच्या युद्धात या विमानांनी केलेल्या अचूक बॉम्बफेकीमुळेच भारताला फायदा झाला. हवाई दलात या विमानांचा वापर इ.स. 1980 पासून होत आहे.

अश्याच ताज्या बातम्यांसाठी महान्यूज संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here