आयआरसीटीसी ट्रेन तिकीट बुकिंग चे बदललेले नियम 2019

IRCTC Updated Ticket Cancellation Rules in Marathi

0
आयआरसीटीसी ट्रेन तिकीट बुकिंग
MahaNews

आयआरसीटीसी ट्रेन तिकीट बुकिंग/कॅन्सलेशन चे नियम (Marathi Lekh | MahaNews) 

रेल्वे तिकिट आरक्षणाचे हे बदललेले नियम, तिकिटे रद्द करण्यासाठी किती पैसे वजा केले जातात:

2-3 करोड़ पेक्षा जास्त लोक दररोज ट्रेनने प्रवास करतात. ट्रेन रद्द झाली तरी समस्या आणि टिकीट रद्द करायचे झाल्यास तरी ही समस्या आहेतच, तरी आपणास या समस्ये पासुन दूर करण्यासाठी आयआरसीटीसी रेल्वे ने तिकिट आरक्षणाचे हे बदललेले नियम सांगत आहे.

आपण टिकीट रद्द केल्यानंतर किती चार्ज लागणार व किती रिफंड मिळणार यासंबधी माहिती देणार आहे. ट्रेनचे तिकीट रद्द करण्याचे चार्जेस आपल्या तिकिटाचा क्लास कोणता आहे यावर, आणि रेल्वे यायच्या किती वेळ अगोदर टिकट रद्द करत आहोत. त्यावर अवलंबून असते की किती रूपये चार्जेस लागणार ते, तर जानुण घेऊयात की आपण टिकीट रद्द केल्यानंतर किती पैसे रद्द करते रेल्वे.

रेल्वे तिकिट आरक्षणाचे (आयआरसीटीसी ट्रेन तिकीट बुकिंग) हे नियम खालील प्रमाणे आहेत:

आयआरसीटीसी ट्रेन तिकीट बुकिंग
Indian Railways

1. आपल्या जवळ ट्रेन चे कंफर्म टिकट आहे आणि निर्धारित वेळेपेक्षा 48 तास टिकिट रद्द केले तर आपणास एसी फर्स्ट क्लास (1A)/एग्जीक्यूटिव क्लास चे 240 रुपये चार्ज लागणार.

AC 2 टायर/ सेकन्ड क्लास साठी 200 रुपये चार्ज लागतो, AC 3 टायर/AC 3 इकॉनोमी/ AC चेयर कार च्या साठी 180 रुपये लागते, तरी स्लीपर क्लास (SL) त्यासाठी 120 रुपये आणि सेकन्ड क्लास सिटिंगसाठी (2S) 60 रुपये लागणार. हा चार्ज एका प्रवाशासाठी असेल, जर एका टिकिटामध्ये दोन प्रवासी असतील तर दोघांचे वेग-वेगळे चार्जेस लागतील.

2. ट्रेनच्या आधी 48 तास ते 12 तासांपर्यंत ट्रेनची तिकिटे रद्द करायचे झाले तर तिकिटाच्या 25 टक्के भाग चार्ज लागतो. यामध्ये पण एक अट अशी आहे की 25 टक्के किंवा 48 तास यामध्ये जो पण चार्ज जास्त असेल तोच लागेल.

3. ट्रेनच्या आधी 4 तास ते 12 तासांपर्यंत ट्रेनची तिकिटे रद्द करायचे झाले तर तिकिटाच्या 50 टक्के भाग चार्ज लागतो. यामध्ये पण एक अट अशी आहे की 50 टक्के किंवा 48 तास अगोदर जी टिकीट रद्द केली त्या चार्जेस पेक्षा जादा असतील तर तोच चार्ज लागेल. आणि ट्रेन च्या वेळेपेक्षा  4 तास अगोदर जर तिकिट कँन्सल केले तर त्याला काही ही पैसे परत भेटणार नाहीत.

4. जर ट्रेन आपल्या निर्धारित वेळेच्या 3 तासांपेक्षा उशीरा असेल आणि आपल्याला प्रवास करू इच्छित नसेल तर आपल्यास तिकिटांचा संपूर्ण परतावा मिळेल.

5. आरएसी तिकिट रद्द करण्यासाठी, रेल्वे सुटण्याच्या वेळेच्या 30 मिनिटांपूर्वीचे तिकिट रद्द केले तर कॅन्सलेशन शुल्क वजा करून रिफंड परत केला जाईल.

6. आपल्याकडे ई-तिकिट असल्यास आणि ट्रेन रद्द झाल्यास टीडीआर-तिकिट डिपॉजिट रिसिप्ट (तिकिट ठेव पावती) दाखल करण्याची आवश्यकता नाही. आपला परतावा आपोआप आपल्या खात्यावर येईल.  त्याचबरोबर काउंटर टिकट चा परतावा काउंटरवरुनच मिळेल.

7. नवीन नियमानुसार, जर आपल्याकडे तत्काळचे कन्फर्म ई-तिकीट असेल आणि ट्रेन 3 तासांहून अधिक उशिराने धावत असेल आणि तुम्हाला प्रवास करायचा नसेल तर त्यासाठी तुम्हाला टीडीआर भरावा लागेल. आणि दुसरीकडे, जर ट्रेन रद्द झाली तर टीडीआर भरावाच लागेल. अन्यथा पैसे मिळणार नाहीत.

8. आपल्याकडे ई-तिकिट असल्यासआणि ते पण वेटिंग तिकिट असल्यास. त्या वेटिंग तिकिट सोबत आपण प्रवास करू शकत नाही.  कारण वेटिंग ई-तिकिट घेऊन प्रवास केल्यास आपल्यास बिना तिकिट प्रवास करत आहे असे मानले जाईल. ते वेटिंग ई-तिकिट आपोआप रद्द होते आणि त्याचे पैसे ज्या खात्यातून तिकिट बुक केले होते त्याच खात्यात जमा होतात.

अश्याच चांगल्या माहितीसाठी महान्यूज संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here