कोल्हापुरात रोड रोमिओला महिलांनी दाखवला इंगा

0
road romeo dhulai
road romeo dhulai

कोल्हापुरातील रंकाळा तलाव परिसरात तरुणी-महिलांना त्रास देणाऱ्या युवकांचा उपद्रव वाढत आहे. संध्याकाळच्या वेळी काही तरुण अर्धनग्न अवस्थेत फिरत असतात. युवती, महिलांकडे पाहून शेरेबाजी, टिंगलटवाळी तसेच अश्लील वर्तनाचे प्रकार येथे वारंवार घडत असतात. वेळोवेळी अनेक संघटनामार्फत त्यांना समाज देण्याचा प्रयत्न करण्यात आले मात्र हा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालल्याने परिसरातील महिला वर्गात संताप होता.

असाच प्रकार काल बुधवारी सायंकाळी देखील घडला. ताराबाई रोडवर आडोशाला थांबलेल्या एका तरुणाने रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांकडे पाहून अश्लील वर्तन केले. महिलांनी परिसरातील काही तरुणांना हा प्रकार सांगितल्यावर त्यांनीही संबंधिताला ताकीद दिली मात्र हे वर्तन चालूच राहिल्याने महिला संतापल्या. त्यांनी त्याला पकडून भर चौकात चपलांनी धुलाई केली. या प्रकाराने तेथे बघ्यांची गर्दी जमली. महिलांचा रुद्रावतार आणि संतप्त जमाव पाहून तरुणाने त्या ठिकाणाहून पळ काढला.

अखेर येथील महिलांनी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडे तक्रार केली. संबंधित युवकाविरुद्ध कठोर कारवाई व्हावी अशी मागणी संतप्त महिलांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here