(Laxmi Ganesha Puja) लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आई लक्ष्मी आणि गणपतीची पूजा का करतात?

लक्ष्मी आणि गणपती पूजन एकत्र का करतात या विषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.

1
laxmi ganesha pujan in marathi
laxmi ganesha pujan in marathi

(Laxmi Ganesha Puja) दीपावलीत माता लक्ष्मी आणि श्रीगणपतीच्या पूजेस मोठे महत्त्व आहे. त्यांच्या पूजेशिवाय हा उत्सव अपूर्ण राहतो. पण बर्‍याचदा हा प्रश्न मनात पडतो की दीपावलीच्या वेळेस लक्ष्मी आणि गणेशजींच्या पूजेस इतर देवतांपेक्षा जास्त प्राधान्य का दिले जाते? चला, आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर आणि त्याचे धार्मिक महत्त्व सांगत आहोत.

दीपावली च्या दिवशी लक्ष्मीपूजनाचे महत्त्व:

आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे.

अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. आई लक्ष्मी ही संपत्तीची धनाची देवी आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. लक्ष्मी देवीच्या कृपेनेच एखाद्याला ऐश्वर्य व वैभव प्राप्त होते. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात.

lakshmi pujan in marathi, laxmi ganesha puja
lakshmi pujan in marathi

कार्तिक अमावस्येच्या शुभ तारखेला संपत्तीची देवीला प्रसन्न करून आणि सुख समृद्धीचे आशीर्वाद घेतले जातात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.

दीपावली होण्यापूर्वी शरद पौर्णिमेचा सण आई लक्ष्मीच्या जयंती प्रमाणे साजरा केला जातो. मग त्यांची दीपावली च्या वेळेस लक्ष्मीपूजन दिवशी पूजा केली जाते, धन धान्य आणि संपत्ती साठी संपत्तीची देवतेकडे पुजा अर्चा केली जाते.

लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती’ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, म्हणून या पूजेची विशेषता आहे.

दीपावळीत गणपती पूजेचे महत्त्व (Laxmi Ganesha Puja):

गणपतीला ज्ञानाचा देवता म्हटले जाते. हिंदू धर्मात कोणतीही पूजा आणि विधी गणपतीच्या पूजेशिवाय सुरू होत नाहीत. दीपावलीवरील गणपती पूजेचेही हे एक कारण आहे. तसेच, श्रीमंतीच्या देवीची उपासना केल्याने समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर, एखाद्या व्यक्तीला चांगल्या शहाणपणाची आवश्यकता असते. जेणेकरून तो पैसा योग्य वापरासाठी वापरला गेला पाहिजे.

लक्ष्मी पूजन करण्याची पद्धत :

लक्ष्मी पूजनाच्या भरपूर पद्धती आहेत तरी आज आम्ही आपल्याला सोपी आणि योग्य पद्धत सांगणार आहे. लक्ष्मी पूजन करण्या आधी घरासमोर रांगोळी काढावी. तसेच घरातील दाराजवळ दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे. तुळशीपासून घरातील देवापर्यंत लक्ष्मीची पावले काढावीत.

लक्ष्मीपूजन करताना एका चौरंग घ्यावे. चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा आणि चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. एक चांदी, तांब्या किंवा कलश घेऊन त्यात जरा गंगा जल मिसळून तो तांब्या अर्ध्याच्यावर तो तांब्या भरून घ्यावा. हे कलश त्या चौरंगावर ठेवावे.

ganesh pujan in marathi, laxmi ganesha puja
ganesh pujan in marathi

कलशावर नारळ ठेवून पाच आंब्याचे पानं त्या भोवती सजवावे. कलशाभोवती ताजी फुलं सजवावी. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. समोर सोने, चांदी किंवा साधा शिक्का ठेवावा. आता गणपती कलशाच्या उजव्या बाजूला स्थापित करावा आणि त्यांच्यासमोर अक्षदा ठेवाव्यात.

आता देवीजवळ व्यापार संबं‍धित पुस्तक किंवा डायरी, नवीन वही ठेवावी. परंतू पुस्तकाचे कव्हर चमड्याचे नसावे. आता पूजेचे सामान आणि लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीचे तिलक करावे. तिलक अनामिका बोटाने करावे. समोर गायीच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा व धूप लावावा. उदबत्ती वापरु नये कारण उदबत्तीची बांबूची असल्याने पूजेत वापरु नये. पूजा स्थळी केरसुणीची पूजा करावी. 

आता हातात फुलाच्या पाखळ्या, अक्षदा घेऊन हात जोडून शांत मनाने गणपती आणि नंतर लक्ष्मीची आराधना करावी. लक्ष्मी मंत्र किंवा ऊँ महालक्ष्मयै नम: जप करु शकता. षोडशोपचार पूजन करावे. सर्व नैवेद्य श्रद्धापूर्वक अर्पित करावे. पूजा झाल्यावर आरती करावी.

आरती नंतर देवीला घरात आगमानाची प्रार्थन करावी आणि काही चुकलं असल्यास क्षमा याचना करावी. या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या बारा वाजेपर्यंत सुरु ठेवावे. या रात्री दिवा रात्रभर जळत ठेवावा.

अश्याच चांगल्या माहितीसाठी आणि मराठी लेखांसाठी महान्यूज संकेतस्थळाला भेट देत राहा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here