Maha Vikas Aghadi: शेतीसाठी 12 तास वीजपुरवठा करावा, उरलेल्या शेतमालावर उदरनिर्वाह करणाऱ्या गोर-गरीब शेतकऱ्यांची वीज कपात थांबवावी, यासह विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीने आज विधानसभेच्या पायऱ्यांवर निदर्शने केली.

शेती आणि शेतकरी महाराष्ट्राचा मुख्य आत्मा आहे. महाराष्ट्र हे प्रगतिशील राष्ट्र असून येथे अनेक प्रकारचे पीक घेतले जाते. त्यामुळे सर्व त्या मूलभूत सोयीसुविधा शासनाने तत्परतेने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे मात्र या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतीस अखंडित वीजपुरवठा केला जाणे गरजेचे आहे. मात्र महाराष्ट्रात सध्या विपरीत परिस्थिती आहे.

शेतकरी बांधवांना रात्री ऐवजी दिवसा मुबलक वीज मिळणे आवश्यक आहे. मात्र शासन याबाबत कमालीचे उदासीन आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागत असून त्याचा उत्पन्नावर ही परिणाम होत आहे. तसेच थकीत वीजबिलामुळे शेतकऱ्यांची वीजतोडणी लगेच केली जात आहे. अर्थिक अडचणीमुळे वीज भरून शकणाऱ्या शेतकरी बांधवांवर सरकारने अत्याचार करणे थांबवावे या मागणीसाठी विधीमंडळ अधिवेशनादरम्यान आदोलन केले असून जो पर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत या आंदोलनाची धग कमी होणार नाही.