Maharashtra State Board Exam 2023: जय महाराष्ट्र, आपला MAHANEWS.co.in मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण कॉपीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची कोणती महत्त्वपूर्ण कारवाई करणार या बद्दल जाणून घेणार आहोत, काही दिवसातच १० वी १२ वी च्या बोर्ड परीक्षा सुरु होणार असून. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची कायम फसवणूक होत असते. या फसवणूक रोकण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठे पाऊल घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळात बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी अनोळकी व्यक्तींना सुमारे ५० मीटर अंतरा आत मध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

महाराष्ट्र बोर्ड परीक्षा केंद्रांची विभागणी करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, चाचणी स्थानांभोवती अधिक पोलीस बंदोबस्त असेल. कृपया विद्यार्थ्यांना कळवा की महाराष्ट्र बोर्ड 12वी, किंवा HSC, परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होईल. बोर्डाने तारीख पत्रक आधीच सार्वजनिक केले आहे.
महाराष्ट्र बोर्डाच्या माहिती नुसार १० वी १२ वी परीक्षा फेब्रुवारी व मार्चमध्ये होईल. अधिक माहितीसाठी थेट https://www.mahahsscboard.in/ वेबसाइटला भेट देऊ शकता.
महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र कधी मिळणार ?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या कडून १० वी आणि १२ वी परिक्षेची प्रवेशपत्र जारी केले आहेत. तरी विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशपत्र देण्यात येईल. १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेत संपर्क साधावा तेथे तुम्हाला प्रवेशपत्राची हार्ड कॉपी मिळेल.
10 मिनिटं कपात करणार का काय आहे बोर्डाचा निर्णय ?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा तर्फे पेपर लिहायच्या आधी विद्यार्थ्यांना प्रश्नपञिका व्यवस्थित वाचावी. यासाठी १० मिनिटे वेळ दिला जात होता त्याच दरम्यान पेपर फुटीचे प्रकार होत होते. यासाठी प्रश्नपञिका व्यवस्थित वाचण्यासाठी दिलाजाणार वेळ दिला जाणार नाही.