महाविकास आघाडीचं खातेवाटप अखेर जाहीर

0
Mukhyamantri
Mukhyamantri

मुंबई (१२ डिसेंबर) – महाविकास आघाडीचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. शिवसेनेच्या वाट्याला गृह आणि नगरविकास खातं देण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. तर सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग, उच्च तंत्र शिक्षण या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. छगन भुजबळ यांना ग्रामविकास, जलसंपदा, सामाजिक न्याय या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर जयंत पाटील यांच्याकडे अर्थ नियोजन, गृहनिर्माण आणि सार्वजनिक आरोग्य या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. नितीन राऊत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम तर बाळासाहेब थोरात महसूल, उर्जा खातं सोपवण्यात आलं आहे.

कोणाकडे कोणते खाते आहे ते पहा –

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री – कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग
एकनाथ शिंदे – गृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृत व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.
छगन भुजबळ – ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.
बाळासाहेब थोरात – महसूल, उर्जा व अपारंपरिक उर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर खातेवाटप कधी होणार? हा प्रश्न विचारला जात होता. त्या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेच्या दोन, राष्ट्रवादीच्या दोन आणि काँग्रेसच्या दोन मंत्र्यांनी शपथ घेतली होती. मात्र त्यांना खाती देण्यात आली नव्हती. आता हे खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here